Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 आरोपींना अटक, मेंदू छिन्नविछन्न करणारा प्रकार

मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांना आपल्या कारवाईत 2 बाळांची सुखरुप सुटका करण्यात यश आलं आहे.

मुंबईत लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 आरोपींना अटक, मेंदू छिन्नविछन्न करणारा प्रकार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 3:59 PM

काही घटना इतक्या भयानक असतात की, अशा घटना कानावर पडल्या की आपला मेंदू छिन्नविछन्न होतो. मुंबईत देखील अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे या घटनेचा उलगडा झाला आहे. मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल तपास केला. या तपासातून पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीत एका डॉक्टराचादेखील समावेश आहे. तसेच आरोपी हे मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये काम करत असल्याची देखील माहिती पोलिसांच्या तापासातून समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांना आपल्या कारवाईत 2 बाळांची सुखरुप सुटका करण्यात यश आलं आहे. मुंबईतल्या काही हॉस्पिटलमध्ये हे आरोपी काम करत होते. त्यामुळे आता काही हॉस्पिटलही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या केलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.

आरोपी डॉक्टरचं दिव्यात क्लिनिक

या प्रकरणात एक आरोपी डॉक्टर आहे. या डॉक्टरचं दिवा येथे एक क्लिनिक आहे. हा डॉक्टर मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. या रॅकेटमधील त्याचा सहभाग आढळून आला आहे. कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे पालक गेले असावेत. तिथे त्यांचा संपर्क झाला असावा. हा आमचा संशय आहे, असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

तेलंगणा आणि हैदराबादमधून बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव

विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरी देण्यात आलं होतं. खास करुन तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती आणि त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करुन या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपींनी या गँगच्या माध्यमातून विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत. तर 3 मुली आहेत. कमीत कमी 5 दिवस ते जास्तीत जास्त 9 महिने असं विक्री केलेल्या बाळांचं वय आहे, अशीदेखील माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :

  • वंदना अमित पवार
  • शितल गणेश वारे
  • स्नेहा सूर्यवंशी
  • नसीमा खान
  • लता सुरवाडे
  • शरद देवर
  • डॉ. संजय सोपानराव खंदारे

मुलांची सर्वाधिक डिमांड, पोलीस तपासातून उघड

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गँगकडून मुलांची सर्वाधिक विक्री केली जायची. कारण तेलंगणा आणि हैदराबाद अशा भागातून मुलांची डिमांड जास्त होती. त्यामुळे आरोपी पालकांना पैशांचं आमिष दाखवत त्यांची विक्री करण्यास भाग पाडायचे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणी आता पालकांवर देखील कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. पण बाळाला जन्म देणारेच माता-पिता आपल्याला पाल्याला कसं विकू शकतात? हा मोठा प्रश्न आहे. या प्रकरणी पोलीस काय-काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.