बँक मॅनेजर खातेदारांची माहिती द्यायचा, त्याचे सहकारी एटीएम क्लोन करुन पैसे चोरायचे, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांनी क्लोनिंग कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे (Mumbai Police busted ATM clone racket).

बँक मॅनेजर खातेदारांची माहिती द्यायचा, त्याचे सहकारी एटीएम क्लोन करुन पैसे चोरायचे, मोठ्या टोळीचा पर्दाफाश
बँक मॅनेजर खातेदारांची माहिती द्यायचा, त्याचे सहकारी एटीएम क्लोन करुन पैसे चोरायचे, मोठ्या टोळीचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 5:06 PM

मुंबई : मुंबई पोलिसांनी क्लोनिंग कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या हा एक बँक मॅनेजर होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे तीनही आरोपी एटीएम क्लोनर आहेत. तर त्यांच्या टोळीचा म्होरक्या असलेला बँक मॅनेजर आणि आणखी एक आरोपी फरार आहे. त्या दोघांचाही शोध सुरु आहे. अटक केलेल्या आरोपींकडून एटीएम कार्ड, क्लोनिंग मशीनसह मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे (Mumbai Police busted ATM clone racket).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

क्लोनिंग कार्डच्या माध्यमातून काहीजण मोबाईलच्या दुकानात मोबाईल खरेदी करीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. संबंधित माहिती मिळताच मुंबई पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी तिथून मोबाईल खरेदी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 40 पेक्षा जास्त एटीएम कार्ड, 250 ब्लँक एटीएम कार्ड, क्लोनिंग मशीनसह पिन नंबर आणि डेटा जप्त केला (Mumbai Police busted ATM clone racket).

बँक मॅनेजर खातेदारांच्या खात्याची माहिती द्यायचा

पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता या टोळीचा मुख्य सूत्रधार बंगळुरूमध्ये बसलेल्या एका बँकेचा मॅनेजर आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली. बंगळुरुमध्ये बसलेला त्यांचा सहकारी बँक मॅनेजर त्यांना बँकेच्या खातेदारांच्या खात्याचे तपशील आणि त्यांच्या एटीएम पिनचा डेटा पाठवायचा. त्या माहितीच्या मदतीने हे तीन आरोपी एटीएम कार्ड क्लोन करत असत आणि एटीएममधून पैसे काढत होते. ज्यांच्या खात्यातून पैसे काढले जात होते त्यांना पैसे काढल्यानंतर माहित पडत होतं.

एटीएम क्लोनिंग करणाऱ्या आरोपींना 15 टक्के कमिशन

विशेष म्हणजे बँक मॅनेजर एटीएम क्लोनिंग करणाऱ्या आरोपींना एकूण काढलेल्या पैशांच्या 15 टक्के कमिशन देत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आता या प्रकरणातील फरार बँक मॅनेजर आणि आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत. यासह आतापर्यंत किती लोकांच्या खात्यातून संबंधित टोळीने पैसे काढले आहेत, याचाही तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या : 

व्हेल माशाच्या उलटीचा म्हणजेच कोट्यवधींच्या ‘वोमिट गोल्ड’चा काळाबाजार करणारे दोन जण ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई

पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी भोवली, पोलिसाकडून सासऱ्यांची गोळी झाडून हत्या

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.