AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तासाचा 2 लाख रुपये रेट, कोरोनाने शूटिंग बंद, मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या अभिनेत्रीची कहाणी

कोरोनामुळे अनेकांची आर्थिक गणितं ढासाळली. मात्र, मुंबईत कोरोनाने शुटिंग बंद झाल्यानं टॉप मॉडेल आणि अभिनेत्रींनी थेट सेक्स रॅकेटचा सहारा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जुहुतील एका पंचतारांकित हॉटेलमधून एका अभिनेत्रीला आणि मॉडेलला ताब्यात घेतलंय.

2 तासाचा 2 लाख रुपये रेट, कोरोनाने शूटिंग बंद, मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या अभिनेत्रीची कहाणी
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 12:21 PM
Share

मुंबई : कोरोनामुळे अनेकांची आर्थिक गणितं ढासाळली. मात्र, मुंबईत कोरोनाने शुटिंग बंद झाल्यानं टॉप मॉडेल आणि अभिनेत्रींनी थेट सेक्स रॅकेटचा सहारा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जुहुतील एका पंचतारांकित हॉटेलमधून एका अभिनेत्रीला आणि मॉडेलला ताब्यात घेतलंय. या अभिनेत्रीने टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय, तर मॉडेलने अनेक मोठ्या ब्रँडसाठी जाहिरात केलीय. या मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासासाठी दोन लाख रुपये चार्ज करत होत्या.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी मॉडेल आणि अभिनेत्रीला अटक केलेलं नसून त्यांची सुटका केल्याचं म्हटलंय. तसेच ग्राहकांसोबत पैशांची बोलणी करणाऱ्या दलाल महिलेला मात्र अटक करण्यात आलीय. आरोपी दलालाचं नाव इशा खान असं आहे. ती ग्राहकांशी फोनवर बोलून मॉडेल निश्चित करायची. यासाठी ती त्यांचे फोटो ग्राहकांना पाठवायची. फोटो पाहून निवड झाली की वेळ आणि ठिकाण ठरवून पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बूक केली जायची. यासाठी ती ग्राहकाकडून 2 तासांचे 2 लाख रुपये घ्यायची. यातील 50 हजार रुपये दलाल घेत, तर उर्वरित दीड लाख संबंधित मॉडेल किंवा अभिनेत्रीला दिले जायचे.

अभिनेत्री आणि मॉडेलचा सेक्स रॅकेटमध्ये सहभाग कसा?

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अभिनेत्री आणि मॉडेलने सांगितलं की कोरोना काळात त्याच्या हातातील शुटिंगचं काम बंद झालं. कुठेच काम मिळत नसल्यानं आर्थिक अडचण आली. त्यानंतर या दलाल महिलेच्या संपर्कात येऊन या सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्याची माहिती अभिनेत्रीने पोलिसांना दिली.

मुंबई पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश कसा केला?

मुंबई पोलिसांनी ग्राहक बनून दलाल महिलेशी संपर्क केला. तसेच तिला मित्रांना टॉप मॉडेल हव्या असल्याचं सांगितलं. यानंतर दलाल महिलेने फोटो पाठवून 2 तासाचे 2 लाख रुपयांवर डिल फिक्स केली. मात्र, मुंबई पोलिसांनी ग्राहक बनून जात पंचतारांकित हॉटेलच्या बाहेरचं दलाल महिलेसह मॉडेल आणि अभिनेत्रीला ताब्यात घेतलं.

हेही वाचा :

मुंबईत सेक्सटॉर्शनचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त, सामान्यांपासून बॉलिवूडचे 100 सेलिब्रिटीज अडकल्याचा अंदाज

पुरुषांना देह व्यापार करण्याचं आमिष दाखवून लूट, तिघांची टोळी जेरबंद

पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका

व्हिडीओ पाहा :

Mumbai Police expose high profile racket including Actress and Model

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.