‘कभी खुशी कभी गम’मधून डेब्यू ते ताईक्वांदोत सुवर्ण, NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी सर्वकाही

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

'कभी खुशी कभी गम'मधून डेब्यू ते ताईक्वांदोत सुवर्ण, NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी सर्वकाही
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 12:12 PM

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले असून यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.

कोण आहे आर्यन खान?

आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा. तो 23 वर्षांचा आहे. त्याने लहानपणीच काही बॉलिवूडपटांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये द लायन किंग, द इन्क्रेडिब्ल्स (हम है लाजवाब) यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. 2004 मध्ये त्याला हम है लाजवाब या अॅनिमेशनपटासाठी सर्वोत्कृष्ट डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कारही मिळाला होता.

चित्रपटातून अभिनय

2001 मध्ये कभी खुशी कभी गम चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने शाहरुखच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 2006 मध्ये कभी अलविदा ना कहना सिनेमातही तो झळकला होता.  लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतलं. तर युनिव्हर्सिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियामधून त्याने चित्रपट निर्मिती आणि लेखन विषयात पदवी मिळवली.

ताईक्वांदोमध्ये सुवर्ण

महाराष्ट्रातील ताईक्वांदो स्पर्धेत त्याला 2010 मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्याच्याकडे ब्लॅक बेल्ट असून मार्शल आर्ट्समध्येही तो प्रशिक्षित आहे. त्याला क्रीडा क्षेत्रातही विशेष रस आहे.

900 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती

2020 मध्ये आर्यनची संपत्ती 120 ते 140 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी आर्यन खानच्या नावाने एक एमएमएस व्हायरल झाला होता. यामध्ये आर्यन आणि बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन नव्यानवेली नंदा असल्याची चर्चा होती. मात्र नंतर तो व्हिडीओ फेक असल्याचं निष्पन्न झालं.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

क्रूझवर रेव्ह पार्टी

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.

समीर वानखेडेंचा क्रूझवर प्रवेश कसा

त्यानुसार अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून एनसीबीचे मोजकेच अधिकारी क्रूझवर दाखल झाले होते. क्रूझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली.

क्रूझ मुंबईच्या दिशेने वळवली

पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रूझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रूझमध्ये बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कपड्यांमधून ड्रग्ज आणले

पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

 शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई

RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...