गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणातील सह-आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, मुंब्र्यात लपून ड्रग्जची विक्री, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

मुंब्रा पोलिसांकडून ड्रग्ज तस्करांच्या विरोधात कठोर कारवाई सुरु आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एका खतरनाक गुन्हेगाराला अटक केली आहे. हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्र्यात लपून ड्रग्जची विक्री करत होता. त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे हा आरोपी गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणातील सह आरोपी असल्याचीदेखील माहिती समोर येत आहे.

गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणातील सह-आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, मुंब्र्यात लपून ड्रग्जची विक्री, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणातील सह-आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 6:37 PM

टी सीरिजचे मालक गुलशम कुमार हत्या प्रकरणातील सह-आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याला पोलिसांनी अटक केली होती. इम्तियाज दाऊद मर्चंट हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्र्यात लपून बसला होता. तो मुंब्र्यातील दस्तगीर मंजिल येथे राहून ड्रग्ज विक्रीचा काळा धंदा करत होता. पोलीस त्याच्या शोधात होते. पोलिसांकडून ड्रग्ज विक्रिच्या विरोधात कडक कारवाई सुरु आहे. त्यामुळे मुंब्र्यात ड्रग्ज विक्री करणाऱ्या तसेच तशी टोळी चालवणाऱ्यांच्या शोधात पोलीस होते. पोलिसांकडून सातत्याने या प्रकरणी कारवाई सुरु होती. अखेर या प्रकरणी पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांना या प्रकरणात अखेर मोठा मासा गळाला लागला आहे. हा आरोपी साधासुधा आरोपी नसून त्याच्या नावावर धक्कादायक आरोप आहे. विशेष म्हणजे हा आरोपी ड्रग्ज विक्री करत होता. त्याला पोलिसांचं भय राहिलेलं नाही, असं यातून सिद्ध होतं.

गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 मध्ये हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांची हत्या करण्याआधी त्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती. यानंतर गुलशन कुमार यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या हत्या प्रकरणात इम्तियाज दाऊद मर्चंट हा सह आरोपी होता. इम्तियाज मर्चंट याचा सख्खा भाऊ अब्दुल रौफ मर्चंट हा गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इम्तियाज मर्चंट हा आणखी जैन उद्दीन चौगुले हत्या प्रकरणात सह आरोपी होता.

मुंब्रा डायघर हद्दीत लपून एमडी ड्रग्जची विक्री

इम्तियाज मर्चंट याच्यावर कलम 325 आणि इतर किरकोळ गुन्हे देखील यापूर्वी दाखल आहेत. बऱ्याच दिवसांपासून इम्तियाज मर्चंट हा मुंब्रा डायघर हद्दीत लपून एमडी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत एमडी पावडर विक्रीचे आणि सेवन यासंदर्भात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीपीएस पथकामार्फत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई मुंब्रा पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. याप्रकरणी कारवाई करत असताना पोलिसांनी इम्तियाज दाऊद मर्चंट याला अटक केली. पोलिसांना इम्तियाज याच्याकडून 1 लाख रुपयांची 60 ग्रॅम मोफिडीन (एमडी) पावडर जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.