AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत क्रूरतेचा कळस : युवतीवर आधी बलात्कार, चाकूने 26 वार, मग हातोडीने डोके फोडले

आरोपी रिजवान शेख आणि पीडित तरुणीचे संबंध होते. त्यामुळे तरुणी आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होती. लग्नावरून त्यांच्यात काही दिवसांपासून भांडणे सुरू होती. आरोपीला तरुणीशी लग्न करायचे नव्हते.

मुंबईत क्रूरतेचा कळस : युवतीवर आधी बलात्कार, चाकूने 26 वार, मग हातोडीने डोके फोडले
पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 11:19 PM
Share

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या केल्याची घटना काल घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींचा जबाब नोंदवत असताना आरोपींनी पोलिसांसमोर धक्कादायक घटनाक्रम कथन केला. आरोपींनी पीडित तरुणीवर आधी बलात्कार केला. एवढ्यावरच नराधम थांबले नाहीत. बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या अंगावर चाकूने 26 वेळा वार केले. त्यानंतर हातोडीने तरुणीचे डोके फोडले. त्यामुळे तरुणीचा एक डोळाही बाहेर आला होता.

लग्नासाठी दबाव टाकत होती म्हणून काटा काढला

रिजवान शेख आणि फैजल शेख अशी आरोपींची नावे आहेत. या बलात्कार आणि हत्याकांडाचा मास्टर माईंड रिजवान शेख हा आहे. आरोपी रिजवान शेख आणि पीडित तरुणीचे संबंध होते. त्यामुळे तरुणी आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होती. लग्नावरून त्यांच्यात काही दिवसांपासून भांडणे सुरू होती. आरोपीला तरुणीशी लग्न करायचे नव्हते. त्याला तिच्यापासून दूर जायचे होते. त्यामुळे त्याने तिचा काटा काढायचे ठरवले. यासाठी रिजवानने आपला शाळेतील मित्र फैजलची मदत घेतली. फैजलसोबत मिळून त्याने मुलीच्या हत्येचा कट रचला. तरुणीला विश्वासात घेऊन कुर्ला येथील निर्जन असलेल्या एचडीआयएल कॉम्प्लेक्स येथे आणण्यात आले. तेथे प्लाननुसार तिचा काटा काढला.

आरोपींना पकडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेला तिच्या घरातून गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन गेला होता. जिथे त्याचा मित्र आधीच वाट पाहत होता. रिकाम्या इमारतीत पोहोचल्यानंतर आरोपीने तरुणीवर सलग 26 वेळा चाकूने हल्ला केला. यावेळी मुलीच्या मानेला आणि पोटाला लक्ष्य करण्यात आले. पोलिसांना मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. त्यामुळे आपल्यासाठी हे मोठे आव्हान होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, ज्यात हत्येपूर्वी बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली, असे डीसीपी प्रणय अशोक यांनी सांगितले. 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील कुर्ला येथील व्हीबी नगर पोलिसांना एचडीआयएल कॉलनीतील एका रिकाम्या इमारतीच्या टेरेसवर मुलीचा मृतदेह सापडला होता. (Murder after raping a young woman in Kurla, The accused told the chronology)

इतर बातम्या

मुंबई विमानतळावर तब्बल 3 हजार 646 आयफोन जप्त! किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क

जुन्या वादातून पंधरा वार करुन दारुविक्रेत्या ‘मनोज’ची क्रूर हत्या, वर्धेच्या गोंडप्लॉट परिसरात घडला थरार

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.