आर्थिक वादातून महिलेची हत्या करुन आत्महत्येचा बनाव, हत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहून घेतली
आर्थिक वादातून महिलेची हत्या करुन आत्महत्येचा बनाव केल्याप्रकरणी नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी समाधान लांडवे (38) या बँक कर्मचाऱ्याला मृत शितल निकमकडून (36) सुसाईड नोट लिहून घेतली आणि मग तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिला पंख्याला लटकवून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला.
नवी मुंबई : आर्थिक वादातून महिलेची हत्या करुन आत्महत्येचा बनाव केल्याप्रकरणी नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी समाधान लांडवे (38) या बँक कर्मचाऱ्याला मृत शितल निकमकडून (36) सुसाईड नोट लिहून घेतली आणि मग तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिला पंख्याला लटकवून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडवे आणि निकम यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले, “लांडवे यांनी निकम यांच्या पतीला त्यांच्या नावावर वैयक्तिक 6.5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन दिले होते.” मात्र, लॉकडाऊनमुळे निकम यांचे पती आर्थिक संकटात होते आणि ते लांडवे यांना इएमआय भरु शकत नव्हते.
एकतर मला पैसे दे नाहीतर मर
आरोपीच्या जबाबानुसार, “ईएमआय न भरल्यामुळे तो देखील दबावाखाली होता. 21 ऑक्टोबर रोजी निकम यांना तो भेटायला गेला असता दोघांमध्ये या मुद्द्यावरुन कड्याक्याचे भांडण झाले. यावेळी लांडवे यांनी निकम यांना म्हटले की, एकतर मला पैसे दे नाहीतर मर”.
“यावर निकम म्हणाल्या की ‘मी मरेन’. असे सांगताच लांडवे यांनी तिने आधी सुसाईड नोट लिहावी, असे सुचवले. काय होणार आहे याची कल्पना नसलेल्या निकमने सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर आरोपीने साडीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गळ्यात साडी, तुटलेला पंखा आणि सुसाईड नोट
“त्यानंतर त्याने हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला पण तो त्यात यशस्वी झाला नाही. पंख्याचे ब्लेड खराब झाले. नंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला आणि निकमचा मृतदेह बेडरुममध्ये तिच्या गळ्यात साडी, तुटलेला पंखा आणि सुसाईड नोटसह पडलेला आढळून आला”, असंही अधिकारी म्हणाले. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा हे आर्थिक प्रकरण पुढे आलं.
“आम्हाला कर्जाची माहिती मिळाल्यावर आम्ही तपास सुरु केला. घटनेच्या दिवशी आरोपी निकम यांच्या घरी गेल्याचे आम्हाला आढळून आले. त्यानंतर आम्ही त्याला बोलावून चौकशी केली. तो आमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु जेव्हा आम्ही त्याला जरा खडसावून विचारले तेव्हा त्याने सर्व खरं खरं सांगितले”, असं अधिकारी म्हणाले.
सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्याhttps://t.co/snCOhlx5H6
— Arushi Sharma (@ArushiShrama) October 28, 2021
संबंधित बातम्या :
सहा वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर विवाह, लग्नानंतर अफेअर, नाशिकच्या विवाहितेची जयपूरमध्ये हत्या
छळ करून पत्नीचा तब्बल 1 कोटीचा ऐवज हडपला; नाशिकमध्ये गुन्हा दाखल