मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त
मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 8:45 PM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबईत मोठी कारवाई केली. विलेपार्ले परिसरात करोडोंचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्ले परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे. (NCB action in Mumbai again, crores of heroin seized from Vile Parle area)

‘जेएनपीटीमध्ये अफूचे तीन कंटेनर, कारवाई कधी?’

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज (मंगळवार, 2 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे काही अधिकारी बडे ड्रग्ज विक्रेते आणि माफिया यांना सोडून देतात, मात्र काही ग्रॅम ड्रग्ज जप्त केल्यावर लोकांना गोवले जाते, असा आरोप केला होता. त्यांचे प्रकरण मोठे करुन वसुली केली जाते. आजही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) अफूचे तीन कंटेनर उभे आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला.

2020मध्ये वानखेडे आल्यानंतर एक केस नोंदवली आहे. सारा अली खानला बोलावण्यात आलं. त्याच प्रकरणात श्रद्धा कपूरला बोलावण्यात आलं. त्याच प्रकरणात नंतर दीपिका पदुकोणलाही बोलावलं गेलं. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीजला या केसमध्ये बोलावण्यात आलं आहे. अजूनपर्यंत ती केस बंद झालेली नाही आणि त्याबाबत चार्जशीटही दाखल करण्यात आलेली नाही. 14 महिने झाले तरी ही केस बंद होत नाही. त्यात असे काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. याच केसमध्ये कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मालदीवमध्ये ही वसुली करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला.

एनसीबीने 125 कोटी ते 21 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन केले जप्त

नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातही एनसीबीने ऑक्टोबर महिन्यात मोठी कारवाई केली होती. DRE च्या झोनल युनिटने 25 किलो हेरॉईनचा साठा जप्त केला होता. हा साठा एका कंटेनरमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 125 कोटी रुपये होती. याप्रकरणी नवी मुंबईतील एका व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील न्हावाशेवा येथेही हा कंटेनर इराणहून आला होता. या कंटेनरमध्ये हेरॉईन सापडले. सप्टेंबरमध्ये डीआरआयने 2,988.21 किलो हेरॉईन जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 21 हजार कोटी रुपये होती. गुजरातमधील मुंद्रा बंदरावरही कारवाई करण्यात आली. हेरॉईन आधी दिल्लीला नेले जाणार होते. दिल्लीतून ते देशाच्या विविध भागात नेले जाणार होते. विशेषतः पंजाबला पाठवण्याची योजना होती. एवढा मोठा कट उघडकीस आल्यावर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. मात्र याआधी डीआरआयने आठ जणांना अटक केली होती. (NCB action in Mumbai again, crores of heroin seized from Vile Parle area)

इतर बातम्या

परमबीर सिंह कसे पळाले? केंद्र सरकार आणि भाजपनं उत्तर द्यावं, नवाब मलिकांचं आव्हान

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी; देशमुखांची दिवाळी तुरुंगात जाणार

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.