बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा

पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला (NCB raids on bakery who provide drugs to high profile people through cakes in Malad).

बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा
बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 5:05 PM

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी थेट एका बेकरीवर छापा टाकला. एनसीबीची ही कारवाई यशस्वी ठरली. कारण या बेकरीमध्ये प्रचंड महाग असलेला 160 ग्रॅम गांजा मिळाला आहे. विशेष म्हणजे एनसीबीने पहिल्यांदाच अशा ड्रग्ज बेकरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ड्रग्ज माफिया कोणकोणत्या मार्गाने ड्रग्जची तस्करी करतात हे आता यातून स्पष्ट होताना दिसत आहे (NCB raids on bakery who provide drugs to high profile people through cakes in Malad).

एनसीबी अधिकाऱ्यांनी कारवाई नेमकी कशी केली?

एनसीबी अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्ब्यात अधिकाऱ्यांना 160 ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला (NCB raids on bakery who provide drugs to high profile people through cakes in Malad).

बेकरीतील तिघांना अटक

संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतलं. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास अधिकारी करत आहेत. तसेच या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या आणखी मोठ्या जाळ्याचा भंडाफोड होण्याचा अंदाज आहे.

एनसीबीची धडाकेबाज कारवाई

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचं प्रकरण समोर आल्यापासून एनसीबी सक्रिय झालं आहे. तेव्हापासून एनसीबीने आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. अनेक ड्रग्ज माफियांना अटक केली आहे. तसेच बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांनाही पकडलं आहे. तसेच अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींची देखील चौकशी केली आहे. एनसीबीने नुकतंच म्हणजेच दोन दिवसांआधी दक्षिण मुंबईतील विदेश डाक कार्यालयात मोठी कारवाई केली होती. एनसीबीने तिथून जळपास 2.2 किलो गांजा जप्त केला. विशेष म्हणजे तो गांजा कॅनेडाहून मुंबईत पार्सलद्वारे पाठवण्यात आला होता. संबंधित पार्सल नेमकं कुणासाठी होतं याचा तपास सध्या एनसीबी अधिकारी करत आहेत.

हेही वाचा : आधी प्रेमाचं नाटक, नंतर पॉर्न व्हिडीओ बनवत ब्लॅकमेलिंग, मिसेस राजस्थानचं घृणास्पद कृत्य

'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्..
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्...
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'.
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य.
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,.
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल.
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?.