Mumbai Drugs Siezed : कोट्यवधींच्या अंमली पदार्थांसह नायजेरियनला मालवणी पोलिसांकडून अटक
मालवणी येथील म्हाडा मैदानाजवळ एक नायजेरियन ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची खबर मालवणी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मालवणी पोलिस ठाण्यातील एपीआय हसन मुलाणी व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला अंमली पदार्थांसह रंगेहाथ पकडले.
मुंबई : मुंबईच्या मालवणी पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज (Drugs)सह एका नायजेरियन नागरिकाला अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी नायजेरियन नागरिकाला अटक करून 5 प्लास्टिक पिशव्यांमध्ये 750 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिक्टर ऑगबोन्ना उर्फ चुकवुन्यु असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा नायजेरियाचा आहे. सध्या मालवणी पोलिसांनी व्हिक्टर ऑगबोना उर्फ चुकवुन्यु याला अटक करून अंमली पदार्थ पुरवठा प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास करत आहेत. (Nigerian arrested by Malvani police with billions of rupees worth of drugs in mumbai)
मालवणी पोलिसांनी सापळा रचून केली अटक
मालवणी येथील म्हाडा मैदानाजवळ एक नायजेरियन ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची खबर मालवणी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मालवणी पोलिस ठाण्यातील एपीआय हसन मुलाणी व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला अंमली पदार्थांसह रंगेहाथ पकडले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 5 प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यात 750 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले, ज्याची किंमत 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये आहे. हा आरोपी मालवणी व नजीकच्या अमली पदार्थ विक्रेत्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करायचा. (Nigerian arrested by Malvani police with billions of rupees worth of drugs in mumbai)
इतर बातम्या
Abu Salem : अबू सालेम प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले !