CCTV : खड्ड्यामुळे तोल गेला, थेट टँकरच्या चाकाखाली आला, तरुणाचा जागीच जीव गेला! दिवा आगासन रोडवरील अपघात कॅमेऱ्यात कैद

एका स्कूटीवर जात असलेला तरुण खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करत असतो. पण एका खड्ड्यात तरुणाची स्कूटी आदळते आणि त्याचा स्कूटीवरील तोल जाते. यानंतर रस्त्यावर कोसळेल्लाय तरुणाच्या शरीरवरुन समोरचा टँकर धडधडत जातो.

CCTV : खड्ड्यामुळे तोल गेला, थेट टँकरच्या चाकाखाली आला, तरुणाचा जागीच जीव गेला! दिवा आगासन रोडवरील अपघात कॅमेऱ्यात कैद
भीषण अपघात...Image Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 11:43 AM

ठाणे : रस्त्यावरील खड्ड्यामुळे (Pothole death News) आणखी एका तरुणाचा जीव गेलाय. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याही (Bike accident CCTV) कैद झाली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल गेला. समोरुन येत असलेल्या टँकरच्या मागच्या चाकाखाली हा तरुण चिरडला गेला. यामुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिवा आगासन (Diva Aagsan Road) रोडवर झालेल्या या अपघातमुळे एकच खळबळ उडाली होती. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातातली मृत तरुणाचं नाव गणेश पाले असं आहे. या अपघातानंतर पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यावर आरोप केला जातोय. युवकाच्या अपघाती मृत्यूला तेच जबाबदार असल्याची टीका केली जातेय. त्यामुळे या सगळ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खूर्चनही रस्त्यावरील खड्डे काही कमी होत नाहीत. उलट दरवर्षी खड्ड्यामुळे अनेकांना जीव गमावाला लागतोय. त्यामुळे याप्रकरणी प्रशासन गांर्भीयाने केव्हा लक्ष घालणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

दिवा शहर मंडळाचे भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही या रस्त्यावर दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चाळण झालेल्या या रस्त्यावर मृत्यूचे खड्डे लोकांचे जीव घेत असल्याचं अधोरेखित झालंय. दरम्यान, या अपघाताची काळजाचा ठोका चुकावणारी दृश्यदेखील समोर आली आहेत.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दोन बाईक, एक रिक्षा आणि एक व्यक्ती पायी चालताना दिसतोय. तर समोरच्या बाजूने एक टँकर येताना दिसतोय. एका स्कूटीवर जात असलेला तरुण खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करततो. पण एका खड्ड्यात तरुणाची स्कूटी आदळते आणि त्याचा स्कूटीवरील तोल जातो. यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या तरुणाच्या शरीरवरुन समोरचा टँकर धडधडत जातो. मागून येत असलेल्या दुसऱ्या दुचाकी आणि रिक्षावाल्यासमोरच ही थरारक घटना घडते. या घटनेनंतर या मार्गावर वाहतूक कोंडीही होते. पण तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिक प्रयत्न करतात. दुर्दैवाने ते यशस्वी होत नाहीत. भलामोठा टँकर शरीरावरुन गेल्यानं तरुणाचा जागीच जीव जातो.

पाहा व्हिडीओ :

आतापर्यंत खड्ड्यांमुळे सात बळी

याआधी ठाणे जिल्ह्यात 6 जणांचा खडड्यामुळे जीव गेलाय. आता ही संख्या सातवर पोहोचली आहे. 9 ऑगस्ट रोजी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, खड्ड्यांमुळे ट्रकच्या किंवा अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली चिरडलं गेल्यांचा आकडा लक्षणीय आहे. अशाने मृत्यू होण्याचं प्रमाणही चिंताजनक असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. त्यामुळे अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन खड्ड्येप्रश्नी गंभीर आणि तातडीची पावलं उचलणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.