करणी केल्याची भीती घालायचा, 28 वर्षांचा भोंदूबाबा सुशिक्षांताना लुटायचा! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

कथित मांत्रिक म्हणून स्वतःला म्हणवून घेणाऱ्या पनव पाटील या 28 वर्षांच्या तरुणाचं सगळं बिंग फुटलंय. कल्याण कोर्टात हजर केलं असता या भोंदूबाबाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

करणी केल्याची भीती घालायचा, 28 वर्षांचा भोंदूबाबा सुशिक्षांताना लुटायचा! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
डोंबिवलीतील भोंदूबाबाला अटक (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 11:21 AM

डोंबिवली : डोंबिवलीत सुशिक्षितांना गंडा घालून लाखो रुपयांना लुटणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. जळगावमधून या भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. थोड्याथोडक्या नव्हे तर 32 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा चुना या भोंदू बाबानं लावल्याचं उघडकीस आलं आहे. या भोंदू बाबाचं नाव पवन बापुराव पाटील (Pawan Bapurao Patil) असू त्यांचं वय 28 वर्ष आहे. मुळच्या जळगावातील (Jalgaon) असलेल्या या तरुणानं डोंबिवलीमध्ये करणी बाधा काढून देतो, असं म्हणत अनेकांना गंडवलं. अखेर या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आता या तरुणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. आपल्या हातचलाखीनं अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या या बदमाश तरुणानं डोंबिवलीत (Dombivali Crime) अनेकांची फसवणूक केली असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

कथित मांत्रिक म्हणून स्वतःला म्हणवून घेणाऱ्या पनव पाटील या 28 वर्षांच्या तरुणाचं सगळं बिंग फुटलंय. कल्याण कोर्टात हजर केलं असता या भोंदूबाबाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या भोंदूबाबाची कसून चौकशी सुरु आहे. करणी, भूत-प्रेतबाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजाराचा गंडा घालणारा हा तरुण नेमका आहे कोण? त्यानं नेमकं असं का केलं? किती जणांना गंडा घातला, याची आता कसून चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या प्रियांका राणे यांच्या तक्रारीनंतर या भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे.

नेमकं करायचा काय?

सुशिक्षितांना गंडा घालणारा हा तरुण हातचलाखीत तरबेज होते. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबानं स्वतःच्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू यामध्ये देवीची चांदीची प्रतिमा काढून दाखवण्यास सुरुवात केली होती. इतकंच काय तर लोकांवर करणी करण्यात आल्याची भीती घालून तो लोकांना लुबाडायचा. करमी काढण्यासाठी कर्च करावा लागेल, असं सांगून या तरुण भोंदूबाबानं अनेकांना लुबाडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या भोंदूबाबानं आपल्या आणि आपल्या आईच्या बँक अकाऊंटमधून 2019पासून आतापर्यंत वेळोवेळी 31 लाखापेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच लाखो रुपयांच्या भेटवस्तूही त्यांनं घेतल्या होत्या.

कुठं फसला गेम?

कळव्यात राहणाऱ्या एका गृहिणीनं सगळ्यात आधी या भोंदूबाबाविरोधात तक्रार दिली होती. 32 वर्षांच्या प्रियांका राणे यांनी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात या तरुणानं आपला विश्वासघात करुन फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रियंका राणे यांची आई राहत असलेल्या घरी येऊन या भोंदूबाबानं सगळ्यांना भुरळ घातली होती. प्रियंका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला त्यांच्या अंगात सप्तश्रृंगी देवी संचारत असल्याचं भासवून या भोंदूबाबानं लुबाडलं होतं. अखेरीस पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करत थेट जळगावातून या तरुणाला अटक केली आहे. शनिवारी पहाटे या तरुणाला डोंबिवली पोलिसांनी जळगावातून बेड्या ठोकल्यात.

संबंधित बातम्या :

Satara : साताऱ्यात अंनिसने उतरवलं अंधश्रद्धेचं भूत, जनजागृती करीत महिलेच्या डोक्यावरील जटा कापल्या!

चोर समजून रिक्षा चालकाला इतरं मारलं, इतकं मारलं की तो मेलाच! कुटुंबीयांचे गंभीर आरोप

लातुरात कोयत्यानं सपासप वार, नांदेडमध्ये खून करुन हाडं नदीत फेकली, 5 मित्रांनी आपल्याच मित्रांना का संपवलं?

नवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री, काय होती मोड्स ओपरेंडी?

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.