Mumbai Murder : धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून मामाने केली भाचीच्या प्रियकराची हत्या, वाचा नेमकं काय घडलं ?

दीपकला त्याच्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी आरोपीने आधी त्याला पार्टी देण्याच्या बहाण्याने भाईंदरला नेले. त्यानंतर त्याला भाईंदर खाडीजवळ नेले आणि त्याला भरपूर बिअर पाजली आणि भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर नेले. फोटो काढण्याच्या बहाण्याने तेथेच त्याने त्याला ढकलून दिले.

Mumbai Murder : धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून मामाने केली भाचीच्या प्रियकराची हत्या, वाचा नेमकं काय घडलं ?
धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून मामाने केली भाचीच्या प्रियकराची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 2:53 PM

मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मामाचा स्वतःच्या भाचीवरच जीव जडला आणि या एकतर्फी प्रेमप्रकरणा (Love Affair)तून मामाने भाचीच्या प्रियकराचा काटा काढल्याची घटना घडली आहे. आरोपीने मयत तरुणाला आधी भरपूर बियर पाजण्यात आली आणि त्यानंतर भाईंदरच्या खाडीत ढकलले. यामुळे बुडून तरुणाचा मृत्यू (Death) झाला. दिपक कट्टूकर (20) असे मयत तरुणाचे नाव आहे तर सूरज विश्वकर्मा (27) असे हत्या (Murder) करणाऱ्या आरोपी मामाचे नाव आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपी सूरज विश्वकर्माला अटक केली आहे. भाचीवर प्रेम जडल्याने तिच्या प्रियकराला मार्गातून बाजूला करण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली.

काय आहे नेमके प्रकरण ?

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर तिच्याच मामाचे प्रेम जडले होते. मात्र तरुणीचे आधीच दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे भाचीच्या प्रियकराला आपल्या प्रेमाच्या मार्गातून हटवण्यासाठी मामाने हा हत्येचा कट रचला. आरोपी सूरज विश्वकर्माने भाचीचा प्रियकर दीपक कट्टूकर यास 12 मे रोजी मुंबईला लागून असलेल्या भाईंदर खाडीजवळ नेले. तेथे त्याला भरपूर बिअर प्यायला लावली. दीपक बिअरच्या नशेत तर्र झाल्यानंतर सूरजने त्याला भाईंदर खाडीवरील रेल्वे पूलावर फोटो काढण्याच्या बहाण्याने नेले. फोटो काढण्याचा बहाणा करत दीपकला रेल्वे पुलावरून खाडीत ढकलून दिले. त्यामुळे दीपकचा बुडून मृत्यू झाला.

असे उघडकीस आले प्रकरण ?

दीपक कट्टूकर हा दोन दिवस घरी न परतल्याने 14 मे रोजी त्याच्या कुटुंबीयांनी कांदिवली पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या साहाय्याने तपास सुरू केला असता, आरोपी सूरज विश्वकर्मा याने बेपत्ता दीपक कट्टूकर याला कांदिवली रेल्वे स्थानकावरून भाईंदरच्या दिशेने नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रकरणाचा तपास सुरू असताना कांदिवली पोलिसांना वसईच्या समुद्राच्या किनारी एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटो दीपक कट्टूकरच्या कुटुंबीयांना दाखवला असता मृतदेहाची ओळख पटली. मात्र तोपर्यंत वसई पोलिसांनी मृताचा मृतदेह बेवारस म्हणून पुरला होता. कांदिवली पोलिसांनी मयताचा मृतदेह पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढला आणि त्याचे मेडिकल करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

हे सुद्धा वाचा

कांदिवली पोलिसांनी आरोपी सूरज विश्वकर्मा याला अटक करून चौकशी केला असता आरोपीचेही त्याच मुलीवर प्रेम असल्याचे निष्पन्न झाले. दीपकला त्याच्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी आरोपीने आधी त्याला पार्टी देण्याच्या बहाण्याने भाईंदरला नेले. त्यानंतर त्याला भाईंदर खाडीजवळ नेले आणि त्याला भरपूर बिअर पाजली आणि भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर नेले. फोटो काढण्याच्या बहाण्याने तेथेच त्याने त्याला ढकलून दिले. (Out of one sided love, the uncle killed his nieces lover in mumbai)

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.