VIDEO | पालघरमध्ये मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला, बीचवर पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर मुंबई येथून काही पर्यटक फिरण्यासाठी गेले होते. हे पर्यटक मद्य प्राशन करुन धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

VIDEO | पालघरमध्ये मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला, बीचवर पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 8:10 AM

मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यात पर्यटनाला बंदी असतानाही समुद्र किनारी धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यास पोलीस गेले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सध्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. मात्र रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर मुंबई येथून काही पर्यटक फिरण्यासाठी गेले होते. हे पर्यटक मद्य प्राशन करुन धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली.

यावेळी मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवरच हल्ला केला. पर्यटकांनी आपली गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला जात आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून वणगाव पोलीस ठाण्यात 3 पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

सिंहगडावरही पर्यटकांवर कारवाई

दुसरीकडे, कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटन स्थळी गर्दी करु नका, असे वारंवार सांगूनही अनेकजण सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच काही अतिउत्साही पर्यटकांना पुणे पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक जण सहली काढत आहेत. सिंहगड हा अशा लोकांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. त्यानंतही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे.

पुणे पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी 88500 रुपयांचा दंड वसूल केला. एकूण 177 जणांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संबंधित बातम्या :

सिंहगडावर गर्दी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांचा इंगा; दोन दिवसांत 88500 रुपयांची दंडवसुली

(Palghar Chichani Beach Tourists attempt to attack Police by Car)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.