Palghar Accident : मुंबई अहमदाबाद मार्गावर पुन्हा सायरस मिस्त्रींच्या कारप्रमाणेच अपघात! टेम्पो डिव्हायडरला धडकून 1 जखमी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 48 तासांत झालेल्या दुसऱ्या भीषण अपघाताने चिंता वाढवली आहे. त्याचप्रमाणेच राज्यातील वाढत्या अपघातांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे.

Palghar Accident : मुंबई अहमदाबाद मार्गावर पुन्हा सायरस मिस्त्रींच्या कारप्रमाणेच अपघात! टेम्पो डिव्हायडरला धडकून 1 जखमी
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 1:30 PM

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmadabad National Highway) रविवारी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Car accident) यांच्या कारचा अपघात झाला होता. दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना होऊन 48 तास उलटण्याच्या आतच आता आणखी एका अपघाताची नोंद करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताप्रमाणेच हाही अपघात झाला. एक टेम्पो (Palghar Accident) डिव्हायडरला धडकला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकासह दोघेजण या टेम्पोमध्ये होते.

आधी ब्रेकफेल आणि मग अपघात!

पालघर जिल्ह्यातील धानिवरी नदी पुलाजवळ टेम्पो अपघातग्रस्त झाला. अपघात होण्याआधी हा टेम्पो एक खड्ड्यामध्ये आदळला होता. खड्ड्यात आदळल्याने टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. यानंतर टेम्पो सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताप्रमाणेच पुलावरील डिव्हायरला धडकला.

या टेम्पोमध्ये ड्रायव्हरस अन्य दोघेजण होते. त्यातील एकाला गंभीर जखम झाली आहे. या जखमीवर कासा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. तर अन्य दोघांना किरकोळ मार बसलाय. सुदैवानं तिघेही जण या भीषण अपघातामधून अगदी बालंबाल बचावले आहेत. GJ 15 AV 4332 या गुजरात राज्यात नोंदणी असलेल्या टाटा कंपनीचा टेम्पोच्या दोन्ही दरवाजासह समोरच्या बाजूचंही अपघातात नुकसान झालंय.

हे सुद्धा वाचा

पाहा LIVE घडामोडी : Video

अपघात सत्र

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 48 तासांत झालेल्या दुसऱ्या भीषण अपघाताने चिंता वाढवली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील वाढत्या अपघातांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताची घटना ताजी असतानात दुसरीकडे नितेश राणे यांच्याही कारचा किरकोळ अपघात झाला होता. एका ट्रकने नितेश राणे यांची कार टोलनाक्यावर असताना मागून धडक दिली. ही धडक किरकोळ असल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला होता. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हापासून पुन्हा एकदा रस्ते अपघाताचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.