लाखो-कोट्यवधींच्या कार, चोरीसाठी चक्रावून सोडेल अशा टेक्निकल पद्धतीचा वापर, अट्टल कारचोर अखेर जेरबंद

शहरात धुमाकूळ घातलेल्या कारचोरांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 13 कारसह 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लाखो-कोट्यवधींच्या कार, चोरीसाठी चक्रावून सोडेल अशा टेक्निकल पद्धतीचा वापर, अट्टल कारचोर अखेर जेरबंद
कोड-डिकोड, नंतर बनावट चावी, लाखो-कोट्यवधींच्या कार सहज चोरायला, चक्रावून सोडेल अशी चोराची टेक्निकल पद्धत
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 10:35 PM

नवी मुंबई : शहरात धुमाकूळ घातलेल्या कारचोरांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 13 कारसह 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचं नाव तौफिक हबिबूला खान उर्फ मनोज गुप्ता असं आहे. या आरोपीच्या चौकशीतून आतापर्यंत 24 गुन्ह्यांची उकल झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 14, ठाणे पोलीस आयुक्तालयात 5, मीरा भाईंदर 2, मुंबई 1, पिंपरी चिंचवड 1, राजस्थान 1 असे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. तर आरोपीकडून मारुती, स्विफ्ट डिजायर, सियाज, हुंदाई 120, फॉर्चूनर, इनोव्हा अशा एकूण 81 लाख 80 हजर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चोराकडून दहा मिनिटात कार चोरी

या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहमद तौफिक हबिबूला हा सराईत वाहन चोर आहे. त्याने अलीबाबा डॉट कॉम या संकेतस्थळावरुन 65 हजार किंमतीचे टूलकिट विकत घेतले होते. या टूलकिटचा वापर करुन बीएमडब्ल्यू, फॉरच्युनर, हुंदाई अशा परदेशी कंपन्यांची कोणतीही गाडी असो तो दहा मिनिटात चोरी करत असे.

चोर महागड्या गाड्या कशा चोरायचा?

आरोपी पार्क असणाऱ्या कारचे दरवाजाचे काच फोडून दरवाजा उघडायचा. नंतर कारचे टूल बॉक्स ओपन करुन डी. सी. एम सर्किट डिस्कनेकट करायचा. त्यानंतर कारचे बोनट ओपन करुन सायरन मोड डिस्कनेकट करायचा. नंतर पुन्हा कारमध्ये जाऊन ओ. सी. एम सर्किट बनवायचा. त्यानंतर पुन्हा कारखाली उतरुन एक्सटर्नल वायरने बॅटरी ते फ्युज बॉक्स जोडायचा. त्यानंतर आधुनिक पद्धतीच्या टॅब वापरुन त्यास वायफाई कनेक्ट करुन वाहनांची स्विच ऑन/ऑफ कि वर चाबी ठेऊन कोड, डिकोड करायचा.

यातून तो डुप्लिकेट चावी बनवायचा. नंतर एक्सटर्नल नट बॉक्स आणि बॅटऱ्या जोडलेले वायर काढायचा. नंतर डुप्लिकेट चावीने गाडी सुरु करुन वाहन चोरी करत असे. शिवाय या चोराला कोणत्याही परदेशी कंपनीची गाडी चोरी करणे सहज शक्य आहे. तसे तंत्रज्ञान तो वापरात असे.

पोलिसांच्या ‘या’ पथकाकडून कारवाई

नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबई परिसरात झालेल्या कारचोरी संदर्भात घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीला पकडण्यात यश प्राप्त केले आहे. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा, कक्ष 1, नवी मुंबईचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, पोलीस मामलेदार शशीकांत जगदाळे, पोलीस शिपाई जालींदर गायकर, सहायक पोलीस निरीक्षक हर्बल कदम, पोलिस नाईक निलेश किंद्रे, पोलिस नाईक भांगरे व पोलिस शिपाई संतोष मिसाळ यांनी ही कामगिरी पार पाडली.

हेही वाचा :

अघोरी प्रयोगाने पत्नीचा छळ, पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रावर मोक्का, पोलिसांची मोठी कारवाई

पोलीस कोठडीतील आरोपीचा कंटनेरखाली चिरडून मृत्यू, अपघात की घातपात? नातेवाईकांचा सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.