दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा तीनने सोमवारी रात्री (14 जून) सापळा रचून देशभर धुमाकूळ घातलेल्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत (Police arrest thieves gang in Nalasopara).
नालासोपारा (पालघर) : मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा तीनने सोमवारी रात्री (14 जून) सापळा रचून देशभर धुमाकूळ घातलेल्या आणि गोडासन या आंतरराष्ट्रीय चोरी आणि दरोड्यासाठी कुख्यात असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. ही टोळी भिकाऱ्याचा वेशात दुकानाबाहेर रेकी करायची. नंतर मध्यरात्री दरोडा टाकायची (Police arrest thieves gang in Nalasopara).
पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचा इरादा, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराच्या मदतीने ही टोळी नालासोपाऱ्यातील संतोष भुवन या परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकणासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (14 जून) रात्री 12 च्या सुमारास सापळा रचत या टोळीला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून मिरची पावडर, कटावन्या, कोयते जप्त केले आहेत. पण या टोळीतील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे (Police arrest thieves gang in Nalasopara).
टोळीने देशभरात धुमाकूळ माजवला
संपूर्ण भारतभर या टोळीने धुमाकूळ माजवला आहे. मोठी मोबाईलची दुकाने, शोरूम्स, पेट्रोलपंप यांना ही टोळी शिकार बनवत होती. यातील एक ते दोन जण दुकानांसमोर चादर घेवून भिकाऱ्याच्या वेशात रेकी करत असत. त्यानंतर वेळ बघून दरोडा घालत असत. दरोड्यात विकेलेला माल हे नेपाळमध्ये जावून विकत असत. यात एक नेपाळचा ओळखपत्र असलेला इसम सुद्धा पोलिसांना सापडला आहे. या टोळीने दिल्ली, हैद्राबाद, महाराष्ट्र, कर्नाटक अशा अनेक भागात चोरी आणि दरोडे टाकले आहेत. तसेच मुंबई, पुणे आणि ठाण्यात त्यांनी अनेकवेळा चोरी केली असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : मोठी बातमी ! कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक