Mumbai Bike Thief Arrest : मैत्रिणींना खूश करण्यासाठी करायचे दुचाकी चोरी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले

बोरीवली एमएचबी कॉलनीतील एक रॉयन एनफिल्ड बाईक चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात प्राप्त झाली होती. या बाईकशी साध्यर्म असलेली रॉयल एनफिल्ड बाईक घेऊन मालवणी परिसरात दोन इसम फिरत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले.

Mumbai Bike Thief Arrest : मैत्रिणींना खूश करण्यासाठी करायचे दुचाकी चोरी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले
मैत्रिणींना खूश करण्यासाठी करायचे दुचाकी चोरी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 8:19 PM

मुंबई : बदनामी आणि मैत्रिणींना खूश करण्यासाठी दुचाकी (Two Wheeler) चोरणाऱ्या दोन तरुणांना एमएचबी पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आणखी तीन चोरीच्या दुचाकीही जप्त (Seized) करण्यात आल्या आहेत. विकी विनोद गजबे आणि सुफियान इस्माईल शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून दोघेही दहिसर परिसरातील रहिवासी आहेत. एमएचबी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही आरोपी आपल्या मैत्रिणींना आपल्या दुचाकीवर फिरवण्यासाठी नवीन दुचाकी चोरायचे आणि नंतर चोरीच्या दुचाकी विकायचे.

चोरट्यांकडून चोरीच्या तीन बाईक हस्तगत

बोरीवली एमएचबी कॉलनीतील एक रॉयन एनफिल्ड बाईक चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात प्राप्त झाली होती. या बाईकशी साध्यर्म असलेली रॉयल एनफिल्ड बाईक घेऊन मालवणी परिसरात दोन इसम फिरत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता चोरीची घटना उघडकीस आली. हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरील सराईत चोरटे आहेत. त्यांच्याकडून रॉयल एनिफल्ड बुलेट, एक हीरो होंडा स्लेंडर, एक होंडा ॲक्टिव्हा अशा तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी पोलस अधिक तपास करीत आहेत.

चंद्रपूरमध्ये दुचाकी चोरट्यांना बेड्या

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत वाहन चोरीच्या गुन्ह्यातील पाच चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या चोरट्यांकडून 15 वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक गठीत करून वाहन चोरट्यांचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रदीप संजय शेरकुरे, विजय शंकर देवगडे, राजेंद्र नानाजी काळे, रोशन अशोक गोबाडे, विपुल प्रभाकर मेश्राम या पाच चोरट्यांना अटक केली. (Police have arrested two thieves for stealing a bike for girlfriend)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.