प्रिया सिंह सोबत नेमके काय झाले? IAS अनिल गायकवाडच्या मुलाने अंगावर कार नेली की…

instagram influencer priya singh | सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया सिंह हिने आयएएस अधिकारी अश्वजित गायकवाड याच्या मुलावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अश्वजित गायकवाड याची चौकशी केली. अश्वजित याने पोलिसांना काय सांगितले....

प्रिया सिंह सोबत नेमके काय झाले?  IAS अनिल गायकवाडच्या मुलाने अंगावर कार नेली की...
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 3:43 PM

ठाणे, 16 डिसेंबर | राज्यातील टॉप आयएएस अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित आणि इस्टाग्रॉम इंफ्लुएंसर प्रिया सिंह यांच्यातील प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. 26 वर्षीय प्रिया उमेंद्र सिंह ही एक व्यावसायिक ब्यूटीशियन आणि इस्टाग्रॉम इंफ्लुएंसर आहे. तिचे इस्टाग्रॉमवर लाखो फॉलोअर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियाने अश्वजितवर अनेक आरोप केले आहेत. अश्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. त्या ठिकाणी प्रियाला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला. तिच्या अंगावर कार घातली, असा आरोप केला. प्रियाने आपल्या पोस्टमध्ये अश्वजितसह त्याचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील, आणि सागर शेळके आणि चालक शिवा यांची नावे घेतली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अश्वजित याची चौकशी केली.

काय म्हणाला अश्वजित गायकवाड

अश्वजित याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, प्रिया सिंह माझी केवळ मित्र होती. मी परिवाराच्या कार्यक्रमामुळे हॉटेलमध्ये आला होतो. त्या ठिकाणी प्रिया पोहचली. तिने जबरदस्तीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने मद्यपान केले असल्यामुळे मी नकार दिला. त्यानंतर ती गोंधळ घालू लागली. शिवीगाळ करु लागली. माझ्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मारहाण सुरु केली. त्याचवेळी चालकाने गाडी सुरु केली. त्यावेळी प्रिया रस्त्यावर पडली. हा एक अपघात होता. प्रियाचा माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अश्वजितने केला.

कोण आहे प्रिया सिंह

मुंबईत राहणारी प्रिया सिंह 26 वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिचे इस्टाग्रामवर लाखो फॉलोअर आहेत. तिचे अश्वजितशी प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अश्वजित याचे लग्न झाले आहे. त्याने ते आपल्यापासून लपवून ठेवल्याचा प्रियाचा आरोप आहे. माझा घटस्फोट झाला असून तुझ्याशी मी लग्न करणार असल्याचे तो सांगत असल्याचे प्रियाकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.