AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! चालत्या लोकलमध्ये दरोडा; महिलेचा फोन आणि पर्स घेऊन आरोपी फरार

दोन दिवसांपूर्वी सकाळी एक 24 वर्षीय महिला प्रवासी मासे घेऊन वसईतील तिच्या घरी जात होती. महिलेने सकाळी 7:57 वाजता लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात ती महिला प्रवास करू लागली. त्यादरम्यान एक संशयास्पद प्रवासी त्या डब्यात चढला.

धक्कादायक ! चालत्या लोकलमध्ये दरोडा; महिलेचा फोन आणि पर्स घेऊन आरोपी फरार
धक्कादायक ! चालत्या लोकलमध्ये दरोडा; महिलेचा फोन आणि पर्स घेऊन आरोपी फरार
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 9:57 PM
Share

मुंबई : लोकल ट्रेन, ज्याला मुंबईची लाईफ लाईन म्हणतात, ती कधीकधी प्राणघातक आणि असुरक्षितही ठरते. बोरिवली जीआरपीच्या हद्दीत चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशाला मारहाण आणि दरोड्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलांच्या डब्यात एकटी महिला प्रवासी पाहून अज्ञात व्यक्तीने महिलेला मारहाण करीत तिचा फोन आणि पर्स घेऊन पळ काढला. घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी आरोपीला घटनेच्या 24 तासांच्या आत अटक केली. आकाश बाबू धोंडे असे अटक आरोपीचे नाव आहे, तो अंधेरी परिसरातील रहिवासी आहे. (Robbery in a moving locomotive; Accused absconding with woman’s phone and purse)

काय आहे घटना?

दोन दिवसांपूर्वी सकाळी एक 24 वर्षीय महिला प्रवासी मासे घेऊन वसईतील तिच्या घरी जात होती. महिलेने सकाळी 7:57 वाजता लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात ती महिला प्रवास करू लागली. त्यादरम्यान एक संशयास्पद प्रवासी त्या डब्यात चढला. संपूर्ण डब्यामध्ये महिलेला एकटे पाहून आरोपीने तिचा मोबाईल हिसकायला सुरुवात केली, जेव्हा महिलेने हस्तक्षेप केला तेव्हा आरोपीने तिला मारहाण केली आणि तिची पर्स आणि मोबाईल घेऊन आरोपी चालत्या ट्रेनमधून खाली उतरला आणि पळून गेला, अशी बोरिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर बोरिवली जीआरपी पोलिसांनी कलम 394,506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये एक संशयास्पद मुलगा दिसला. पोलिसांनी सांगितले की, 13 ऑगस्ट रोजी आम्हाला माहिती मिळाली की हा आरोपी वसई रेल्वे स्टेशनजवळ येणार आहे, त्यानंतर जीआरपी टीमने सापळा लावून आरोपीला अटक केली. आरोपीने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत. ज्या ट्रेनमध्ये हा अपघात झाला आहे ती बोरीवलीहून सकाळी 7:57 वाजताची आहे, ती थेट विरारहून बोरिवलीला येते आणि बोरीवलीनंतर थेट वसईला जाते. (Robbery in a moving locomotive; Accused absconding with woman’s phone and purse)

इतर बातम्या

नागपूर मेट्रोमधून प्रवास करण्यास मुभा, लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचा पुरावा दाखवणे बंधनकारक, वाचा नियम काय ?

ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर नीरज चोप्रा तापाने फणफणला; कोरोनाच्या भितीने केली चाचणी

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.