VIDEO : नालासोपाऱ्यात भर दिवसा ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा, मोठा गदारोळ, ज्वेलर्स मालकाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

विरारमध्ये आयसीआयसी बँकेत दरोडा पडण्याची घटना ताजी असताना आज (21 ऑगस्ट) नालासोपाऱ्यात एका ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे.

VIDEO : नालासोपाऱ्यात भर दिवसा ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा, मोठा गदारोळ, ज्वेलर्स मालकाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद
नालासोपाऱ्यात भर दिवसा ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 8:17 PM

नालासोपारा (पालघर) : विरारमध्ये आयसीआयसी बँकेत दरोडा पडण्याची घटना ताजी असताना आज (21 ऑगस्ट) नालासोपाऱ्यात एका ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या साक्षी ज्वेलर्समध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दरोडा पडला. दोन चोरट्यांनी ज्वेलर्स लुटण्याच्या उद्देशाने ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. यावेळी आरोपींनी ज्वेलर्स मालकाची हत्या केली. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नेमकं काय घडलं?

नालासोपारा पश्चिमेतील साक्षी ज्वेलर्समध्ये आज सकाळी दोन चोरट्यांनी ज्वेलर्स लुटीच्या उद्देशाने प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी ज्वेलर्स मालक किशोर जैन (37) यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी ज्वेलर्समधील सोने लुटले आणि पळून गेले. विशेष म्हणजे भर दिवसा अकरा वाजता ही घटना घडली. त्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून त्यांना पोलिसांची कोणतीही भीती नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

ज्वेलर्स मालकाच्या हत्येनंतर आरोपी पळून गेल्यानंतर परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ज्वेलर्स मालकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेथ दुकानात आढळला. ज्वेलर्सच्या दुकानात त्यांच्या कुटुंबियांनी टाहो फोडत आक्रोश सुरु होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. यावेळी सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद असल्याचं स्पष्ट झालं. पोलीस या प्रकरणाचा सध्या पुढील तपास करत आहेत.

विरारमध्ये बँकेत दरोडा

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विरारमध्येही एका बँकेत दरोडा पडल्याची घटना समोर आली होती. आयसीआयसीआय बॅंकेच्या विरार पूर्वे शाखेत असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बॅंकेतच काम करत होत्या. बॅंकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बॅंकेच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने चाकूने योगिताच्या गळ्यावर-चेहऱ्यावर वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला होता.

घटनेचं गांभीर्य ओळखून श्रद्धा हिने बॅंकेची इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. त्यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र तोपर्यंत आरोपी अनिल दुबे याने श्रद्धावरही अनेक वार केले. त्यात ती देखील गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत श्रद्धाने प्रतिकार केला. पण आरोपीसमोर तिची ताकद कमी पडल्याने त्याने बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानंतर तो बँकेबाहेर पडून फरार होण्यात यशस्वी झाला होता.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

विरारमध्ये ICICI बँकेत सशस्त्र दरोड्याचा थरार, असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू, एकाला अटक

मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला, कोल्हापूर हादरलं

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.