Salman Khan Threat Letter : ‘शलीम खान, सलमान खान बहुद जल्द आपका…’ हेच ते सलमानला आलेलं धमकीचं पत्र

Salman Khan threat letter Photo : एक चुरगळेला कागद समोर आला असून याच कागदावर धमकीचा आशय लिहिला गेलाय.

Salman Khan Threat Letter : 'शलीम खान, सलमान खान बहुद जल्द आपका...' हेच ते सलमानला आलेलं धमकीचं पत्र
हेत ते धमकीचं पत्रImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 12:45 PM

मुंबई : ‘शलीम खान सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होता GB LB’ असं लिहिलेली एक चिट्ठी समोर आली आहे. सलमान खान (Salman Khan) आणि सलीम खान (Salim Khan) यांना आलेलं धमकीच (Salman Khan threat letter Photo) हेच ते पत्र असून या पत्रानंतर आता पोलीस यंत्रणा सतर्क झालीय. सलमान खान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली. भरदिवसा गोळ्या घालून प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेता असलेल्या सिद्धू मुसेवालाच्या हत्येनं संपूर्ण पंजाब हादरुन गेलेलं असताना आता सलमान खानला धमकीचं पत्र आल्यानं यंत्रणा सतर्क झाल्यात. सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचं पत्र आल्याचं वृत्त रविवारीच समोर आलं होतं. त्यानंतर आता पत्राचा फोटोही समोर आलाय.

एक चुरगळेला कागद समोर आला असून याच कागदावर धमकीचा आशय लिहिला गेलाय. याच चिट्ठीनंतर खळबळ उडाली होती. सलमानचा मुसेवाला करु अशी धमकी देणारं ते पत्र हेच आहे. या पत्रानंतर आता पोलिसांनीही गंभीर दखल घेतली आहे. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

सिद्धू मुसेवाला प्रकरण काय?

सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 8 शूटर्स एकत्र आले आणि त्यांना भर दिवसा सिद्धू मुसेवाला याला गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्यात 19 गोळ्या सिद्धूच्या आरपार गेल्या होत्या. जखमी झालेल्या सिद्धूचा 15 मिनिटांत जीव गेला होता. दरम्यान, या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई यानं स्वीकारलीय. या हत्येप्रकरणी अटकसत्र सुरुच आहे. सिद्धूच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही आता समोर आलंय. पुण्यातील दोघांना सिद्धूच्या हत्येसाठी बोलावण्यात आलं होतं. अजूनही याप्रकरणी तपास सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

धमकीचं पत्र कुठे आढळलं?

सलामन खानला धमकी देणारं पत्र त्याच्या सुरक्षा रक्षकांना सापडलं होतं. रविवारी सकाळच्या सुमारास सलमान खानला धमकी देणारं हे पत्र निदर्शनास आलं होतं. सलीम खान जिथं सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जिथं फिरायला जातात, त्या ठिकाणी एका बेंचवर ही चिट्ठी आढळून आली होती.

सुरक्षेत वाढ

सकाळपासूनच माध्यमांचे कॅमेरे आणि सलमान खानचा बंगला याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पोलिसांनी सुरक्षे वाढ केली असून सर्व खबरदारी बाळगली जातेय. या पत्राने सगळ्या भाईजानच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. आता या पत्रामागे नेमकं कोण आहे, याचा तपास केला जातोय.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.