दादरच्या डायमंड ज्वेलरीतील चोरी क्राईम पेट्रोल पाहून; चोरट्यानं सीसीटीव्हीचा ड्राईव्हही पळविला होता

डायमंड ज्वेलरी कार्यालयात चोरी करणाऱ्या बळवंत गुप्ता या आरोपीचे कोरोना काळात काम गेले होते. त्यानंतर तो कामाच्या शोधात होता. मात्र कित्येक दिवस प्रयत्न करूनही काम मिळाले नसल्याने बळवंत गुप्ताने चोरीचा मार्ग अवलंबविला.

दादरच्या डायमंड ज्वेलरीतील चोरी क्राईम पेट्रोल पाहून; चोरट्यानं सीसीटीव्हीचा ड्राईव्हही पळविला होता
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 8:04 PM

मुंबईः मुंबईच्या दादर परिसरात एका डायमंड ज्वेलरी कार्यालयात चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला (Criminal) पोलिसांनी अटक केली आहे. बळवंत गुप्ता असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी (Mumbai Police) अवघ्या दहा दिवसात कार्यालयाची रेखी करून त्याने ही चोरी केल्याची कबूली दिली आहे. चोरी करताना या चोरट्याने क्राइम पेट्रोल (Crime Petrol) सारख्या टीव्हीवरील सिरियल पाहून त्यानुसार चोरी करण्याचा प्रयत्न केला. या चोरीत त्याने मागे कोणताही पुरावा असू नये यासाठी त्याने प्रयत्न केला. आपली चोरी पकडता येऊ नये यासाठी डायमंड कार्यालयातील सीसीटीव्हीचा ड्रायव्हही तो घेऊन गेला होता. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करुन दहा दिवसात त्याला बेड्या ठोकल्या.

डायमंड ज्वेलरी कार्यालयात चोरी करणाऱ्या बळवंत गुप्ता या आरोपीचे कोरोना काळात काम गेले होते. त्यानंतर तो कामाच्या शोधात होता. मात्र कित्येक दिवस प्रयत्न करूनही काम मिळाले नसल्याने बळवंत गुप्ताने चोरीचा मार्ग अवलंबविला. डायमंड ज्वेलरी कार्यालयात चोरी करताना बळवंतने क्राइम पेट्रोलसारख्या टीव्ही सिरियल पाहून त्यातील फंडे वापरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चोरी करताना ही टीव्ही सिरियलमधील कल्पना वापरून चोरी केली असली तरी त्याने चोरी उघडकीस येऊ नये म्हणून सीसीटीव्हीचा डिव्हाईसही चोरुन घेऊन गेला होता. त्यामुळे पोलिसांसमोरही चोराला पकडण्याचे आव्हान होते, तरीही पोलिसांनी दीडशे सीसीटीव्ही फुटजे पाहून त्याला ताब्यात घेतले आहे. ही चोरी करताना त्याने धाडस करुन सतराव्या माळ्याच्या डाकमधून तो बाथरुममधून खाली उतरला होता.

पनवेलमधून चोरट्याला ताब्यात

बळवंत गुप्ताने ही चोरी करण्यासाठी सगळी पूर्वतयारी करून तो डायमंड ज्वेलरी कार्यालयात घुसला होता. ही चोरी करण्यासाठी आणि पोलिसांनी आपल्याला ओळखू नये यासाठीही त्याने पेहराव केला होता. तरीही पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करुन चोरट्याला शिताफीने त्याला पनवेलमधून अटक करण्यात आहे. पोलिसांनी त्याला पकडल्यावर तपासात हे स्पष्ट झाले की, घाटकोपरमध्येही त्याने काही चोरी केल्या आहेत. त्यादृष्टीने पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या

Video | अरे यार, हिनं तर खऱ्या अर्थानं ‘बाईट’ दिला! मुंबई पोलिसांच्या हाताला चावणारी ती कोण?

आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत 21 वर्षीय तरुणाची हत्या, वर्गमित्राला अटक

Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी, 23 तासांच्या चौकशीत काय मिळाल?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.