Mumbai Kidnapping : गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले, मग आयटी मॅनेजरचे अपहरण करुन लुटले; दुकलीला अटक
गोरेगाव पूर्व येथील इन्फिनिटी आयटी पार्क येथे कार्यरत असलेले रवी छोटेलाल जैस्वार 11 जून रोजी कामावरुन घरी जात होते. यावेळी हरीश शडप्पा गायकवाड आणि चंद्रकांत शडाप्पा गायकवाड या दोघांनी त्याला अडवले. वाटेत गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून त्याची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्याला त्याच्या पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कारमध्ये बसवले.
मुंबई : आयटी कंपनीच्या मॅनेजर (IT Manager)ला गुन्हे शाखेचे अधिकारी (Crime Branch Officer) असल्याचे सांगत त्याचे अपहरण (Kidnapping) करुन पैसे लुटणाऱ्या दुकलीला दिंडोशी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे दोघे चोरटे भाऊ आहेत. आधी मॅनेजरला फोन करून आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले, मग गाडीत बसवले आणि एटीएममधून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून पळवून नेले. आरोपींनी मॅनेजरच्या मारहाणीचा व्हिडिओही बनवला. तेथून सुटका झाल्यानंतर मॅनेजरने दिंडोशी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. दिंडोशी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. रवी छोटेलाल जैस्वार असे अपहरण करण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. तर हरीश शडप्पा गायकवाड आणि चंद्रकांत शडाप्पा गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कामावरुन घरी जात असताना मॅनेजरला लुटले
गोरेगाव पूर्व येथील इन्फिनिटी आयटी पार्क येथे कार्यरत असलेले रवी छोटेलाल जैस्वार 11 जून रोजी कामावरुन घरी जात होते. यावेळी हरीश शडप्पा गायकवाड आणि चंद्रकांत शडाप्पा गायकवाड या दोघांनी त्याला अडवले. वाटेत गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून त्याची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्याला त्याच्या पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कारमध्ये बसवले. दोन्ही आरोपी भावांनी रवीला आयटी कंपनीत किती फसवणूक करतोस ते सांग, तू नाही सांगितलं तर तुझ्या मित्रांनाही उचलू. तसेच आज जगायचे असेल तर लगेच 10 हजार दे नाही तर सोडणार नाही, असे सांगितले.
काही अंतरावर गेल्यावर रवीकडून जबरदस्तीने त्याच्या एटीएममधून दोन हजार रुपये काढून घेतले. तसेच त्याचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, आयकार्डही जप्त केले. यानंतर आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर रवीने दिंडोशी पोलिसांनी ठाणे गाठून तक्रार दिली. दिंडोशी पोलिसांनी दोघांनाही मालाड जनकल्याण नगर येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघेही भाऊ फळांचे घाऊक विक्रेते असल्याचे चौकशीत उघड झाले. हे दोघेही बराच वेळ मॅनेजरला गुन्हे शाखेचे अधिकारी सांगून धमकावत होते. (The two men who kidnapped the IT manager claiming to be crime branch officers were arrested)