Cooper Hospital Issue : चुकीचे इंजेक्शन दिल्याने गमवावी लागली दृष्टी, महिलेच्या नातेवाईकांचा आरोप

शिवसेना नेते इंतेखाब फारुकी यांनी जुहू पोलिसांकडे मागणी केली आहे की, संबंधित दोषी डॉक्टरवर चौकशी करून कडक कारवाई करावी, अन्यथा पीडित कुटुंबियांसोबत कूपर हॉस्पिटलच्या बाहेर जोरदार आंदोलन केले जाईल. दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Cooper Hospital Issue : चुकीचे इंजेक्शन दिल्याने गमवावी लागली दृष्टी, महिलेच्या नातेवाईकांचा आरोप
चुकीचे इंजेक्शन दिल्याने गमवावी लागली दृष्टीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:53 PM

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या कूपर रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिकाऊ डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन (Wrong Injection) दिल्यामुळे एका 58 वर्षीय महिलेला आपली दृष्टी (Vision) गमवावी लागल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या मुलाने हा आरोप (Allegation) केला असून या संदर्भात मुलाने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. अंधेरी पूर्वेकडील सहारगाव येथे राहणारी रमिला पुरुषोत्तम वाघेला या महिलेला गेल्या काही दिवसापासून डोळ्यामध्ये मोतीबिंदूचा त्रास होत होता. मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी रमिला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये भरती झाली होती. मात्र ऑपरेशन दरम्यान कूपर रुग्णालयाच्या शिकाऊ डॉक्टरानी चुकीचे इंजेक्शन आणि औषध दिल्यामुळे रमिलाची दृष्टी गेल्याचे त्यांच्या मुलाचे म्हणणे आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते इंतेखाब फारुकी यांनी पीडित कुटुंबीयांची कूपर रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. शिवसेना नेते इंतेखाब फारुकी यांनी जुहू पोलिसांकडे मागणी केली आहे की, संबंधित दोषी डॉक्टरवर चौकशी करून कडक कारवाई करावी, अन्यथा पीडित कुटुंबियांसोबत कूपर हॉस्पिटलच्या बाहेर जोरदार आंदोलन केले जाईल. दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

यवतमाळमध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू

पुसद येथील मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सिझर करत असताना महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रसुती दरम्यान सिझर करण्यात आलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये सिझरिंगमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. माधुरी विलास व्हडगीर (22) असे मयत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांनी नॉर्मल प्रसुती न करता सिझर करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. तशी नातेवाईकांनी डॉक्टरांना सिझर करण्याची परवानगीसुद्धा दिली. त्यावेळी डॉ. अरुणा पापळकर यांनी महिलेचे सिझर केले. महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु एक-दोन तासातच त्या महिलेची प्रकृती खालावली. महिलेला रक्तस्राव जास्त होत असल्याने नातेवाईकांनी दहा बॉटल रक्तसुद्धा खरेदी करून आणले होते. तरी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. (The womans relatives alleged that she lost her sight due to wrong injection)

हे सुद्धा वाचा

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.