गोडाऊनमध्ये लाखो रुपयांची रोकड ठेऊन चावी गुप्त ठिकाणी, त्यानंतरही मालाडच्या कुरिअर कंपनीत चोरी, नेमकं काय घडलं
मालाडमध्ये ऑनलाईन कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून लाखो रुपयांची चोरी झाली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे गोडाऊनमधील लॉकरमध्ये लाखो रुपयांची रोकड ठेऊन चावी गुप्त ठिकाणी ठेवली, तरीही ही चोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं.
मुंबई : मालाडमध्ये ऑनलाईन कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून लाखो रुपयांची चोरी झाली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे गोडाऊनमधील लॉकरमध्ये लाखो रुपयांची रोकड ठेऊन चावी गुप्त ठिकाणी ठेवली, तरीही ही चोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. मात्र, आता मालाड पोलिसांनी 2 चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानं आश्चर्यकारक गोष्ट समोर आल्यात. हे चोर दुसरे तिसरे कुणी नसून याच कंपनीत आधी काम केलेले कर्मचारी आहेत.
कांच पाडा परिसरातील मालाड शॉपिंग सेंटरमध्ये एका ऑनलाइन कुरिअर कंपनीचे गोडाऊन आहे. 24 ऑगस्ट 2021 रोजी तेथील कर्मचारी नेहमीप्रमाणे गोडाऊनच्या लॉकरमध्ये लाखो रुपयांची रोकड लॉक करून निघून गेले. त्यांनी या लॉकरची चावी एका गुप्त ठिकाणी ठेवली. 25 ऑगस्टला सकाळी जेव्हा कर्मचारी गोदामावर पोहचले तेव्हा त्यांना गोदाम उघडे दिसले. तसेच लॉकरमध्ये ठेवलेले 4 लाख रुपये चोरीला गेलेले आढळले.
चोर कंपनीचा माजी कर्मचारी, चावी कधी कुठं ठेवली जाते याची इतंभूत माहिती
या घटनेनंतर मालाड पोलिसांचे डिटेक्शन ऑफिसर पीएसआय बनसोडे आणि त्यांच्या टीमने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली. चौकशी केली असता असे आढळून आले की एका आरोपीने कुरिअर कंपनीच्या गोडाऊनमध्ये आधी काम केले होते. त्याला कधी आणि कुठे चावी ठेवली आहे हे माहीत होते. त्याचाच फायदा घेऊन दोघांनी गोडाऊनमधून लाखो रुपये चोरले.
पश्चिम बंगालला पळून जाण्याआधीच पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
पकडलेल्या पहिल्या आरोपीचे नाव हर्ष मिश्रा आहे, तर दुसऱ्याचे नाव मोहम्मद सोहिल मुस्तफा आलम आहे. मुख्य आरोपी मोहम्मद सोहिल मुस्तफा आलम संध्याकाळच्या ट्रेनने पश्चिम बंगालला पळून जाणार होता, पण त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले, अशी माहिती मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी दिली.
हेही वाचा :
सामसूम रस्ता बघून महिलेला हेरलं, गाडी थांबवली, चाकू दाखवत दमदाटी, दागिने हिसकावले, पोलिसांनी आरोपीला बरोबर घेरलं
चोराची सिनेस्टाईल पळवापळवी, किराणा दुकानदाराला हजारोंचा गंडा, मग नोकराचा मोबाईल हिसकावला, नंतर रस्त्यावर दुचाक्या उडवल्या
चोरी करायला गेला आणि तिथेच झोपला, चोप देऊन उठवला, पोलिसात नेताच भलतंच घडलं
व्हिडीओ पाहा :
Theft in Malad courier company thief arrested