Mumbai Theft : कांदिवलीतील शिव मंदिरात चोरी, समता नगर पोलिसांकडून दोघांना अटक

सध्या सावन महिना सुरु आहे. त्यामुळे शिव मंदिरात सर्वाधिक भाविक येतात. भाविकांकडून नैवेद्य आणि पैसे दान करण्यात येतात. त्यामुळे शिव मंदिरात चोरी करण्याची योजना आखल्याचे पोलीस चौकशीत सांगितले.

Mumbai Theft : कांदिवलीतील शिव मंदिरात चोरी, समता नगर पोलिसांकडून दोघांना अटक
कांदिवलीतील शिव मंदिरात चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 12:28 AM

मुंबई : मुंबईतील कांदिवली पूर्व पोईसर परिसरातील शिव मंदिरा (Shiv Temple)त चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील शिवचा नाग, कलश, मंदिरातील घंटा यासह पूजेचे साहित्य चोरट्यांनी चोरुन (Theft) नेले. चोरीची सर्व घटना मंदिरातील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन चोरट्यांना अटक केली आहे. दोघेही आरोपी पोईसर परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेला शिवचा साप, मंदिराची दोन घंटा, कलशासह मंदिराच्या दानपेटीतून चोरलेले एक हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सध्या सावन महिना सुरु आहे. त्यामुळे शिव मंदिरात सर्वाधिक भाविक येतात. भाविकांकडून नैवेद्य आणि पैसे दान करण्यात येतात. त्यामुळे शिव मंदिरात चोरी करण्याची योजना आखल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. सध्या या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी याआधी किती मंदिरात चोरी केली आहे याचाही पोलीस तपास करत आहेत.

जळगावमध्ये चोरट्यांनी स्टेट बँकेचे एटीएम फोडले

स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी 30 लाखांहून अधिक रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे जळगावमधील बोदवडमध्ये घडली आहे. चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम मशिन कापून रक्कम चोरली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळाचा पंचनामा करुन सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Theft in Shiva temple in Kandivali, two arrested by Samata Nagar police)

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.