AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : अंबरनाथमध्ये भयानक अपघात, कारची दुचाकीला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी (29 सप्टेंबर) रात्री उशिरा अंबरनाथमध्ये घडली. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी आणि 3 वर्षीय चिमुकला हे जखमी झाले आहेत.

VIDEO : अंबरनाथमध्ये भयानक अपघात, कारची दुचाकीला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथमध्ये भयानक अपघात, कारची दुचाकीला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 11:41 PM
Share

अंबरनाथ (ठाणे : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी (29 सप्टेंबर) रात्री उशिरा अंबरनाथमध्ये घडली. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी आणि 3 वर्षीय चिमुकला हे जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली भवानी चौक परिसरात राहणारे मोहसीन मिस्त्री हे काल (29 सप्टेंबर) त्यांची पत्नी सदफ आणि 3 वर्षांचा मुलगा मेहरान यांच्यासह कल्याणला त्यांच्या सासुरवाडीला गेले होते. तिथून हे तिघेही दुचाकीवरुन परतत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास अंबरनाथच्या मटका चौक परिसरात ते आले असता रस्त्यावर स्पीड ब्रेकर आल्यानं मोहसीन यांनी गाडीचा वेग कमी केला. मात्र याचवेळी त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या क्रेटा गाडीनं त्यांना जोरदार धडक दिली.

कारचालक पळून गेला

या अपघातात मोहसीन हे त्यांची पत्नी सदफ आणि मुलगा मेहरान यांच्यासह खाली पडले. स्थानिकांनी तिथे धाव घेत या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या अपघातानंतर कारचालक हा तिथून पळून गेला. मात्र स्थानिकांनी त्याला पाठलाग करून फातिमा शाळेजवळ पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. या अपघातात सदफ यांच्या डोक्याला अंतर्गत दुखापत झाली असून मेंदूतून रक्तस्त्राव झाल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर मोहसीन यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती क्रिटीकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रकाश कौरानी यांनी दिली आहे.

चिमुकला मेहरान थोडक्यात बचावला

हा अपघात घडला, त्यावेळी चिमुकल्या मेहरान याला त्याची आई सदफ यांनी कवटाळून ठेवल्यानं त्याला फक्त मुका मार लागला आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघाताप्रकरणी कारचालक भारत हिंदुजा याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या रक्ताचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी दिली आहे. या अपघातात आपलं मोठं नुकसान झालं आहे. आपल्याला सर्व प्रकारची नुकसानभरपाई देण्याची मागणी जखमी मोहसीन मिस्त्री यांनी केली आहे.

घटनेचा व्हिडीओ बघा : 

मटका चौकात रात्रीच्यावेळी वारंवार अपघाताच्या घटना

अंबरनाथच्या मटका चौक परिसरात रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असतात. शिवाय गाड्याही अतिशय वेगात येत असल्यानं अपघातांचं प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात कमी करण्यासाठी काहितरी उपायोजना करण्याची मागणी केली जातेय.

हेही वाचा :

VIDEO : मुंबईच्या लोअर परळ ब्रिजवर अचानक युटर्न घेतल्याने मोठा अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ समोर

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयचे समन्स

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.