Mumbai Crime : लोकलमध्ये महिला प्रवाशाशी गैरवर्तन करणाऱ्या मद्यधुंद किन्नरला अटक

जीआरपी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक महिला प्रवासी बसली होती. रात्री 10.15 वाजले होते. ट्रेन गोरेगाव रेल्वे स्थानकावर येताच त्याच डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत किन्नरही आत शिरला आणि ट्रेनमध्ये आधीच बसलेल्या एका महिला प्रवाशाला शिवीगाळ करू लागला. यावेळी डब्यात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने किन्नरला पकडले आणि बोरिवली जीआरपीच्या ताब्यात दिले

Mumbai Crime : लोकलमध्ये महिला प्रवाशाशी गैरवर्तन करणाऱ्या मद्यधुंद किन्नरला अटक
लोकलमध्ये महिला प्रवाशाशी गैरवर्तन करणाऱ्या मद्यधुंद किन्नरला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 7:43 PM

मुंबई : विरार लोकलमध्ये महिला प्रवाशाशी गैरवर्तन (Abuse) करणाऱ्या एका मद्यधुंद किन्नरला बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. प्रफुल्ल पांचाळ ऊर्फ सानिया असे आरोपी किन्नरचे नाव आहे. सानियावर याआधीही लोकममध्ये महिलांची लूट करणे, शिवीगाळ असे अनेक गुन्हे दाखल आहेत. विरार लोकल (Virar Local) गोरेगाव स्थानकात येताच हा किन्नर महिला डब्यात चढला. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ किन्नरला पकडून बोरिवली जीआरपीमध्ये आणले. तेथे पोलिसांनी किन्नर विरुद्ध तक्रार नोंदवून त्याला अटक केली आहे.

विरार लोकलमध्ये घडली घटना

जीआरपी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक महिला प्रवासी बसली होती. रात्री 10.15 वाजले होते. ट्रेन गोरेगाव रेल्वे स्थानकावर येताच त्याच डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत किन्नरही आत शिरला आणि ट्रेनमध्ये आधीच बसलेल्या एका महिला प्रवाशाला शिवीगाळ करू लागला. यावेळी डब्यात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने किन्नरला पकडले आणि बोरिवली जीआरपीच्या ताब्यात दिले. याआधीही आरोपी किन्नरवर चालत्या ट्रेनमध्ये लुटणे, महिला प्रवाशांना शिवीगाळ करणे असे गुन्हे दाखल आहेत, एवढेच नाही तर आरोपी किन्नरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. टॉय गनचा धाक दाखवून महिला प्रवाशाला लुटल्याबाबतही या किन्नरवर गुन्हा दाखल आहे. या आरोपात बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटकही केली आहे. (Transgender arrested for abusing a female passenger in a local)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.