मस्ती भोवली! तलवारीने केक कापून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी तरुणांना ठोकल्या बेड्या
कांदिवली परिसरामध्ये सार्वजिनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित तरुणांनी तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता.
मुंबई : कांदिवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 जानेवारी रोजीची ही घटना आहे. 3 जानेवारीला रात्री अकरा वाजता रघुलीला मॉलजवळील फुटपाथवर दोघांनी तलवारीने केक कापत आपला वाढदिवस साजरा केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हयरल झाल्याने पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली. अखेर या दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अटक
सार्वजनिक रस्त्यावर शस्त्र दाखवून दहशत पसरवल्याचा गुन्हा आरोपींवर दाखल करण्यात आला आहे. सिलम बरसम सुब्रमण्यम वय 22 वर्षे आणि कौसर मेजर खान वय 23 वर्षे असे या प्रकरणातील आरोपींचे नावे आहेत. आरोपींनी तीन जानेवारीला कांदिवली परिसरातील फूटपाथवर खुलेआम तलावारीने केक कापला होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. अखेर पोलिसांनी या दोनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आरोपींनी 3 जानेवारी रोजी रघुलीला मॉलजवळील फुटपाथवर तलावारीने केक कापला होता. त्यानंतर संबंधित आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 188, 269, 270, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित बातम्या
Delhi Crime: जॅकेट परत केले नाही म्हणून मित्राची हत्या, दिल्लीतील धक्कादायक घटना
Pune crime | ‘या’ गुन्हयांतर्गत अंर्तगत रवींद्र बर्हाटेला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक