Mumbai Crime : टकटक गँगच्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी या टकटक गँगच्या दोन सदस्यांनी मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. एका गाडीमध्ये कार चालकाचे लक्ष विचलित करून मोबाईल चोरी केल्याची घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

Mumbai Crime : टकटक गँगच्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 4:18 PM

मुंबई : मुंबईमध्ये वाहतूक कोंडीच्या ठिकाणी चारचाकी गाड्यांवर टक-टक करून लोकांचे लक्ष विचलीत करून गाडीतील मोबाईल (Mobile) चोरी करणाऱ्या टकटक गँग (Taktak Gang)च्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 12 ने ही कारवाई केली. वसिम बाबू कुरेशी व निलेश अशोक रांजणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत मुंबई गुन्हे शाखेने मालाडमधील मार्वे रोडवरुन दोन आरोपींना अटक केली आहे. टकटक गँगमध्ये आणखी किती आरोपींचा समावेश आहे, याबाबत पोलिस अटक आरोपींची चौकशी करीत आहेत. (Two accused of Taktak gang arrested by Mumbai Crime Branch)

सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींना अटक

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात वाहतूक कोंडीच्या ठिकाणी सिग्नलवर चार चाकी गाड्यांमधून चोरी करून या टक-टक गँगने परिसरात धुमाकूळ घातला होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी या टकटक गँगच्या दोन सदस्यांनी मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. एका गाडीमध्ये कार चालकाचे लक्ष विचलित करून मोबाईल चोरी केल्याची घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखा 12 च्या युनिटने मालाड मार्वे रोडवरुन दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी मुंबईतील 10 विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये टकटक करून चोरी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

बुलढाण्यात ज्वेलर्स दुकानातून अज्ञात महिलेने सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मोहन चौक परिसरात असलेल्या जांगिड यांच्या ज्वेलर्स दुकानात अज्ञात बुरखाधारी महिलेने सोन्याचे मंगळसूत्र मोठ्या शिताफीने लांबविले असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिला दुकानातून गेल्यानंतर दुकान मालकाने सीसीटीव्ही चेक केल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर दुकान मालकाने शहर पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्या बुरखाधारी महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. (Two accused of Taktak gang arrested by Mumbai Crime Branch)

इतर बातम्या

Nagpur Crime | नागपुरात खंडणी प्रकरणी चार आरोपी जेरबंद, आरोपीने हवालाचे तीस लाख पाठविले?

Pune Crime | पुण्यात शिवसेनेचे उपनेता रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल ; लग्नाचे आमिष दाखवत केली फसवणूक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.