Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसुख हिरेन यांच्यानंतर ठाण्यातील आणखी एका व्यावसायिकाची हत्या, दोघांना बेड्या, पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

ठाण्यातील चरई येथील ज्वेलर्स व्यापारी भरत जैन यांचा मृतदेह शुक्रवारी (20 ऑगस्ट) मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सापडला. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

मनसुख हिरेन यांच्यानंतर ठाण्यातील आणखी एका व्यावसायिकाची हत्या, दोघांना बेड्या, पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
मनसुख हिरेन यांच्यानंतर ठाण्यातील आणखी एका व्यावसायिकाची हत्या
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 11:10 PM

ठाणे : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर आता ठाण्यातील आणखी एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील चरई येथील ज्वेलर्स व्यापारी भरत जैन यांचा मृतदेह शुक्रवारी (20 ऑगस्ट) मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सापडला. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ठाण्यातील व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

जैन यांच्या पत्नीची 15 ऑगस्टला पोलिसात तक्रार

भरत जैन गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नी सीमा जैन यांनी 15 ऑगस्ट रोजी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आपल्या पतीची मिसिंगची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सर्वच बाजूंनी विचार करत जैन यांच्या ज्वेलर्स दुकानावर तपासासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पोलीस ज्वेलर्स दुकानात गेले. तिथे गेल्यावर ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती समोर आली.

सीसीटीव्हीत चोरी कैद

पोलिसांनी ज्वेलर्सच्या दुकानात आणि परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यामध्ये चोरीची घटना कैद झालेली आढळली. एक ओला कार चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याचं निषपण्ण झालं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित ओला चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत दोन ते तीन आरोपी बसताना दिसत आहेत. त्या सर्वांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. त्यानंतर या प्रकरणी बऱ्याच घडामोडी घडल्या. मनसुख हिरेन हे हिरे व्यापारी होते. त्यांचा रेतीबंदर परिसरात मृतदेह सापडल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास थेट मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे एटीएस आणि त्यानंतर एनआयए यांच्याद्वारे या प्रकरणाचा तपास सुरु होता. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरुच आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ही घटना ताजी असताना ठाण्याच्या आणखी एका व्यापाऱ्याचा मृतदेह रेतीबंदर परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

नालासोपाऱ्यात भर दिवसा ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा, मोठा गदारोळ, ज्वेलर्स मालकाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

दारुच्या नशेत जन्मदात्या आईची हत्या, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हळहळला

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.