CCTV : सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या 14 मिनिटं आधी सुसाट कार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद, पाहा थरारक Exclusive व्हिडीओ

Cyrus Mistry car CCTV Video : सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या अवघी 14 मिनिटं आधी त्यांची गाडी दापचरी चेर पोस्ट येथून पास झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची गाडी दिसून आली आहे. दरम्यान, सायरल मिस्त्री यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांत तब्बल 20 किलोमीटर अंतर कापलं असल्याचंही सांगितलं जातंय.

CCTV : सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या 14 मिनिटं आधी सुसाट कार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद, पाहा थरारक Exclusive व्हिडीओ
14 मिनिटं आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली कारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 12:57 PM

पालघर : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या कारचा पालघरमध्ये भीषण अपघात (Palghar Accident News) झाला होता. या भीषण अपघाताच्या आधी सुसाट कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताच्या 14 मिनिटं आधी सायरस मिस्त्री यांची सुसाट कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (Cyrus Mistry Accident CCTV Video) दिसून आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलंय. ज्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात की कार कैद झाली, तिथून पास झाल्यानंतर अवघ्या 14 ते 15 मिनिटांनी सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला, अशी माहिती मिळतेय.

पालघर येथील चारोटी इथे सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला. रविवारी दुपारी हा अपघात झाला होता. या अपघाताला कारचा भरधाव वेग कारणीभूर होता, असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. या अपघाताचा सखोल तपास केला जातोय. दरम्यान, वेगवेगळ्या पैलूंचाही विचार करता या अपघाताचं मूळ कारण काय होतं, तेही चौकशीअंती स्पष्ट होईल. दरम्यान, आता समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये जारी करण्यात आला आहे. यात सायरस मिस्त्री यांची कार स्पष्टपणे कॅमेऱ्यात दिसून आली आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा CCTV व्हिडीओ :

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या अवघी 14 मिनिटं आधी त्यांची गाडी दापचरी चेर पोस्ट येथून पास झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची गाडी दिसून आली आहे. दरम्यान, सायरल मिस्त्री यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांत तब्बल 20 किलोमीटर अंतर कापलं असल्याचंही सांगितलं जातंय. ही बाब पाहता सायरस मिस्त्री यांच्या कारचा वेग हा ताशी 133 किलोमीटर पेक्षाही जास्त होता, असं अंदाज बांधला जातो आहे.

पाहा LIVE घडामोडी :

गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत असताना सायरल मिस्त्री यांची कार अपघातग्रस्त झाली होती. या अपघातात त्यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर ही कार एक महिला चालवत होती. चालक महिला आणि तिचा पती या अपघातात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी सायरस मिस्त्री हे मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. तसंच त्यांच्यासोबत मागे बसलेल्या व्यक्तीनेही सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे या अपघातात जबर मार बसून दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.