ठाण्यात मोबाईल चोरट्यांची इतकी हिंमत? चालत्या रिक्षेतल्या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, निष्पाप महिलेला मृत्यू

ठाण्यात पुन्हा एकदा मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे (woman dies after falling from running rickshaw when thief snatch her mobile in thane)

ठाण्यात मोबाईल चोरट्यांची इतकी हिंमत? चालत्या रिक्षेतल्या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, निष्पाप महिलेला मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 12:00 AM

ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनजवळ एका मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा लोकलखाली पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना याच घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली आहे. पण यावेळी ही घटना लोकल ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकावर नाही तर रस्त्यावर घडली. एक महिला रिक्षाने प्रवास करत असताना अचानक दोन बाईकस्वार येतात. बाईकवर मागे बसलेला महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. पण महिला तो मोबाईल पकडण्याचा प्रयत्न करते. या झटापटीत महिला ही चालत्या रिक्षातून खाली पडते. त्यातच तिचा मृत्यू होतो (woman dies after falling from running rickshaw when thief snatch her mobile in thane).

नेमकं काय घडलं?

मृतक महिलेचं नाव कन्मिला रायसिंग असं असून ती 27 वर्षांची होती. मृतक महिला ही बुधवारी (9 जून) संध्याकाळी ठाण्यात आपल्या मैत्रीणीच्या घरुन आपल्या घरी जात होती. यावेळी तिची आणखी एक मैत्रिण तिच्यासोबत होती. महिला रिक्षाने आपल्या घरी जात असताना तीन हात नाका येथे बाईकवर आलेल्या नराधमाने तिच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने मोबाईल पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती महिलाच धावत्या रिक्षातून खाली पडली. या दुर्घटनेत ती गंभीर जखमी झाली (woman dies after falling from running rickshaw when thief snatch her mobile in thane).

रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

महिलेला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात येतं. महिलेच्या अपघाताची माहिती तातडीने तिच्या कुटुंबियांना देण्यात येते. तिचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईक रुग्णालयात दाखल होतात. सर्वजण तिच्या जीव वाचवण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. मात्र, उपचारादरम्यान कन्मिला रायसिंग या महिलेची मृत्यू होतो. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडते.

याआधीही अशीच घटना घडलेली

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अशीच काहीशी घटना लोकल ट्रेमनमध्ये घडली होती. विद्या पाटील नावाची एर महिला कामावरुन आपल्या घरी डोंबिवलीला जात होती. ती लोकल ट्रेनमध्ये लेडीज डब्यातून प्रवास करत होती. ती ज्या लोकलने प्रवास करत होती ती लोकल कळवा रेल्वे स्टेशनवरुन सुटली तेव्हा एक मोबाईल चोर घाईघाईने लेडीज डब्यात शिरतो. आतमध्ये डब्यात फक्त चार ते पाच महिला होत्या. यावेळी तो विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल घेऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, विद्या त्याला प्रतिकार करतात. यावेळी झालेल्या झटापटीत विद्या लोकलमधून खाली पडतात. त्यातच त्यांचा मृत्यू होतो.

कन्मिला रायसिंग महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसात गुन्हा दाखल

विद्या पाटील यांची घटना ताजी असतानाच ठाण्यात पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या घटनांमधून ठाण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळात सुरु आहे, हे स्पष्ट होतंय. या चोरांना पोलिसांची देखील भीती नसल्याचं स्पष्ट होतंय. दरम्यान कन्मिला रायसिंगच्या मृत्यूनंतर या प्रकरणी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘त्या’ आल्या की चोरी झालीच समजा, बोलण्यात गुंतवून ठेवणाऱ्या तिघींना बेड्या

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.