लग्नानंतर पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध, पतीला संशय, महिलेने प्रियकराच्या मदतीने काटा काढला

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात यश आलं आहे (Woman kills husband with help of boyfriend in Kalyan).

लग्नानंतर पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध, पतीला संशय, महिलेने प्रियकराच्या मदतीने काटा काढला
लग्नानंतर पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध, पतीला संशय, महिलेने प्रियकराच्या मदतीने काटा काढला
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:11 PM

कल्याण (ठाणे) : कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला, तिचा प्रियकर आणि आणखी एका जणाला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येचं गूढ उकलल्यानंतर तरुण राहत असलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे (Woman kills husband with help of boyfriend in Kalyan).

नेमकं प्रकरण काय?

मृतक तरुणाचं नाव प्रविण पाटील असं आहे. तो गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 4 जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी तरुणाची पत्नी लक्ष्मी उर्फ राणी प्रविण पाटील (वय 22) हिची चौकशी केली. त्यावेळी तिने दिलेली माहिती पोलिसांना संशयास्पद वाटत होती. पोलिसांना तिचं वागणं देखील संशयास्पद वाटत होतं (Woman kills husband with help of boyfriend in Kalyan).

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी प्रविण पाटील आणि त्याच्या पत्नीच्या मोबाईलनंबरवर आलेल्या कॉलचा तपास केला. यावेळी पोलिसांना दोन व्यक्ती आरोपी महिलेच्या सतत संपर्कात असल्याचं माहिती पडलं. पोलिसांनी त्या दोघांना चौकशीसाठी बोलावलं. यावेळी त्या दोघांनी चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला. मृतक प्रविण पाटीलच्या पत्नीचं एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती प्रविणला झाली. त्यातून तो तिला त्रास देऊ लागला. त्यामुळे आरोपी लक्ष्मी आणि तिच्या प्रियकराने त्याचा काटा काढण्याचं ठरवलं, असं दोघांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. ते दोघं महिलेसोबत या हल्ल्याचा घटनेत सहभागी होते. तसेच त्या दोघांपैकी एकजण हा महिलेचा प्रियकर आहे.

आरोपींनी कट कसा आखला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी, तिच्या प्रियकराने आणखी एका मित्राने मिळून प्रविणला जीवे मारण्याचा कट आखला. त्यांनी आधी प्रविणला घरी बोलावलं. त्यानंतर त्यांनी प्रविणला हाताबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचा गळा आवळून बेशुद्ध केलं. त्यानंतर गळ्यावर वार करुन त्याला ठार मारले. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रविणचा मृतदेह रिक्षाने नेरळपासून काही अंतरावर असलेल्या शेलू गावाजवळ बदलापुर-कर्जत रोडवर मोरीखाली टाकून दिला. आरोपींच्या या कबुली जबाबानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नी लक्ष्मीसह अरविंद उर्फ मारी रविंद्र राम (वय 20) आणि सनीकुमार रामानंद सागर (वय 19) या तिघांना बेड्या ठोकल्या.

ही संपूर्ण कारवाई वपोनी संजीव जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी विलास पाटील, सपोनी भूषण दायमा, पोउपनिरी नितीन मुदमून, मोहन कलमकर, शरद पंजे, दत्‍ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे,अजितसिंग राजपूत, सचिन साळवी, सचिन वानखडे, गुरुनाथ जरग, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा, नरेश जोगमार्गे, विलास मालशेटे, ज्योतीराम साळुंके, विश्वास चव्हाण, मिथुन राठोड, चित्रा इरपाचे, स्वाती रहाणे, यांनी केली.

हेही वाचा :

महिलांच्या दोन गटांमध्ये तुफान वाद, पुरुषही एकमेकांना भिडले, नंतर थेट पोलीस स्टेशनबाहेर कोयते नाचवले

आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं ‘त्या’ रात्री? गूढ आणखी वाढलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.