वकिलीचा अभ्यास, मानसशास्त्रात पारंगत, सोशल मीडियावर महिलांना फसवायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोशल मीडियावरील महिलांना लग्नाचे खोटे आश्वासन त्यांना लुबाडणाऱ्या एका भामट्याला अटक करण्यात आलंय. त्याने आतापर्यंत 11 महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले असून त्याला मुंबईच्या सायबर सेलने अटक केली आहे.

वकिलीचा अभ्यास, मानसशास्त्रात पारंगत, सोशल मीडियावर महिलांना फसवायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
CYBER CRIME
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 11:15 PM

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील लोक आपला जीवनसाथी शोधतात. यातील अनेक जोडपी ही आजही सुखाने संसार करत आहेत. मात्र याच सोशल मीडियाचा फायदा घेत महिलांना फसवणारे काही भामटे लोकही आहेत. सोशल मीडियावरील महिलांना लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्यांना लुबाडणाऱ्या एका भामट्याला अटक करण्यात आलंय. त्याने आतापर्यंत 12 महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले असून त्याला मुंबईच्या सायबर सेलने अटक केली आहे.

तरुण उच्चशिक्षित, महिलांना लग्नाचे आमिष दाखवून लुटायचा

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सतीश गरुड असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सतीश गारुड हा महिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवायचा. 30 वर्षांवरील तसेच घटस्फोटीत महिलांना तो आपली शिकार बनवायचा. विशेष म्हणजे गारुड हा उच्चशिक्षण घेत आहे. तो गुन्हेगारी मानसशास्त्र आणि एलएलबी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राची परीक्षा देणार होता. उच्च शिक्षण घेत असूनदेखील त्याने महिलांना फसवण्यासारखा मार्ग अवलंबल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आतापर्यंत 12 महिलांना फसवलं

आरोपी सतीश गारूड आधी महिलांशी मैत्री करायचा. नंतर जवळीक वाढवून तो या महिलांना लग्नाचे वचन द्यायचा. नंतर फसवलेल्या महिलांकडून तो भरमसाठ रक्कम घेऊन पळून जायचा. त्याने आतापर्यंत अशा 12 महिलांना आपली शिकार बनवले आहे. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यानंतर विशेष सपाळा रचून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हा आरोपी 30 वर्षांवरील महिला आणि घटस्फोटित महिलांना फसवत असल्याचे आढळून आले आहे.

चित्रफीती तसेच फोटो शेअर करणे टाळा

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणाशीही मैत्री करताना काळजी घ्या. शक्यतो ओळखीच्या व्यक्तींनाच समाजमाध्यमांवर आपला मित्र बनवा. तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सर्व खबरदारी घ्या. चित्रफीती तसेच फोटो शेअर करणे टाळा, असे आवाहन मुंबई सायबर पोलिसांनी केले आहे.

इतर बातम्या :

Omicron Update | ओमिक्रॉनचा धसका ! या जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, लॉकडाऊन लागणार का? काय खबरदारी घ्यावी, टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

Omicron Update | राज्याला दिलासा! डोंबिवली ओमिक्रॉनाबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह, तरीही सावधान!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.