अखेर धोका टळला! अंजनारी पुलावरुन कोसळलेल्या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस शिफ्ट करण्यात यश
Mumbai Goa Highway Accident News : टँकरमध्ये गॅस भरलेला असल्यानं तो दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याची गरज होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळीच एक पथकही तैनात करण्यात आलं होतं. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या टँकरमधील गॅस शिफ्ट करण्यात यश आलं आहे.
मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : मुंबई गोवा हायवेवर असलेल्या (Mumbai Goa Highway News) अंजनारी पुलावरील (Anjnari Bridge Traffic) वाहतूक अखेर सुरु करण्यात आलीय. तब्बल 35 तासांनंतर ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आल्यानं मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. गॅस टँकरच्या अपघातामुळे (LPG Tanker Accident) अंजनारी पुलावरील वाहतूक गुरुवारपासून थांबण्यात आली होती. पर्यायी मार्गाने या महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आलेली होती. अखेर आता पुन्हा ही वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आलीय.
अपघातग्रस्त कंटेनरच्या गॅसची भीती
गुरुवारी दुपारी एलपीजीची वाहतूक करणारा एक टँकर अंजनारी पुलावरुन नदीत कोसळलेला. या टँकरमध्ये 18 मॅट्रिक टन इतका गॅस होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत या मार्गावरची वाहतूक तत्काळ रोखण्यात आली होती. अखेर पर्यायी मार्गाने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. पुलावरुन कोसळल्यामुळे गॅस टँकरचं मोठं नुकसान झालंही होतं.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
बचाव पथकाला यश
टँकरमध्ये गॅस भरलेला असल्यानं तो दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याची गरज होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळीच एक पथकही तैनात करण्यात आलं होतं. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या टँकरमधील गॅस शिफ्ट करण्यात यश आलं आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आलीय.
35 तासांनी वाहतूक पूर्वपदावर
अंजनारी पुलावरुन कोसळलेला एलपीजीचा कंटेनर नदीत पडला होता. या टँकरमधील गॅस शिफ्ट करण्याचं मोठं आव्हानं उभं ठाकलं होतं. अखेर हे आव्हानं बचाव पथकानं पूर्ण केल्यानं आता मोठा धोका टळला आहे. 35 तास मुंबई गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाने जाण्याशिवाय दुसरं गत्यंतर उरलं नव्हतं. अखेर आता पुन्हा ही वाहतूक सुरु करण्यात आल्यानं मोठा दिलासा मिळालाय.