लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, ठाण्याच्या तरुणांची मालवण ट्रीप अधुरी

या अपघातात अमित विनोद कवळे, (वय 22 वर्ष, रा. ठाणे) या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर टेरेस करवालो (वय 22 वर्ष, रा. ठाणे) आणि रोहन जाधव (वय 22 वर्ष, रा. ठाणे) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, ठाण्याच्या तरुणांची मालवण ट्रीप अधुरी
मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलरने तिघांना उडवलं
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 10:36 AM

रायगड : मुंबई गोवा हायवेवर तिघा जणांना ट्रेलरने धडक दिल्याची धक्कादायक घटना (Mumbai Goa Highway Accident) समोर आली आहे. लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरलेल्या तिघा तरुणांना ट्रेलरने उडवल्यामुळे हा भीषण अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या दुर्दैवी अपघातामध्ये एका तरुणाला जागीच प्राण गमवावे लागले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मित्र अर्टिगा कारने ठाण्याहून मालवणला प्रवास करत होते. मात्र त्याआधीच एकाला नियतीने गाठलं. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या गाडीच्या पाठीमागे सहकुटुंब सहपरिवार असा लिहिलेला स्टिकर सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई गोवा महामार्गावर सकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ठाण्याहून मालवणला जाणाऱ्या अर्टिगा (MH 04 GJ 9698) गाडीतील तिघे प्रवासी लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरले होते. त्यावेळी मुंबई बाजुने येणाऱ्या ट्रेलरने (MH 46 AF 5605) या तिघा जणांना उडवलं. त्यानंतर रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या त्यांच्या अर्टिगा कारलाही पाठीमागून धडक दिली.

एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

या अपघातात अमित विनोद कवळे, (वय 22 वर्ष, रा. ठाणे) या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर टेरेस करवालो (वय 22 वर्ष, रा. ठाणे) आणि रोहन जाधव (वय 22 वर्ष, रा. ठाणे) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

या कारमध्ये शुभम गोगले (वय 22 वर्ष, रा. ठाणे) हा तरुणही होता. सकाळी सात वाजताच्या सुमारास कानसई गावच्या हद्दीत बिजली हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात तरणाबांड मुलगा गमावल्यामुळे अमित कवळेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातानंतर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, परंतु थोड्याच वेळात दोन्ही वाहनं एका बाजुला करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.

संबंधित बातम्या :

माजी नौदल अधिकाऱ्याचा पाच जणींवर बलात्कार, दुष्कृत्यानंतर मेसेज करायचा, ‘पुन्हा कधी येऊ?’

हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, 22 वर्षीय तरुणासह बापालाही संपवलं, पुण्यातील शाळेमागे हत्याकांड

तीन लाख देऊन ‘लग्नाळू’ तरुण बोहल्यावर, दहाच दिवसात वधू म्हणाली, “सोडा.. मला आधीच दोन…”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.