Mumbai Crime : हत्येच्या आरोपात सात वर्षापासून फरार होता, पण एक चूक नडली अन् आरोपी थेट तुरुंगात

हत्येचा गुन्हा करुन आरोपी सात वर्षे फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जंग जंग पछाडले. पण एका चुकीमुळे आरोपीच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Mumbai Crime : हत्येच्या आरोपात सात वर्षापासून फरार होता, पण एक चूक नडली अन् आरोपी थेट तुरुंगात
हत्येच्या आरोपात फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 5:46 PM

मुंबई : आपसातील वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गेली सात वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. पण एका लॉटरीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून कांदिवलीतून अटक केली आहे. अजय कुराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करुन पोलिसांनी पुन्हा त्याची कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

काय आहे प्रकरण?

आरोपी 2015 मध्ये झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. काही कारणातून आरोपीसह अन्य दोघांनी मिळून दिपक कदम नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. मयतासोबत वाद झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला बांबूने मारहाण केली होती. या मारहाणीत कदम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

लॉटरीसाठी आला अन् तुरुंगात गेला

यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक करत पोलिसांनी तुरुंगात धाडले होते. मात्र काही दिवसांनी मुख्य आरोपी जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. गेली सात वर्षे नाव बदलून तो विरारमध्ये राहत होता. मात्र कांदिवलीतील घराच्या एसआरएच्या लॉटरीसाठी आरोपी कांदिवलीत आला. तो कांदिवलीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.