लॉकडाऊनमध्ये डोक्यावर कर्ज झालं, मग कर्ज फेडण्यासाठी त्याने जे केलं त्यानंतर थेट तुरुंगातच गेला !

कोरोना महामारीत कामधंदा नसल्याने तो कर्जबाजारी झाला. हे कर्ज फेडायच्या या विवंचनेत तो होता. अखेर त्याला एक कल्पना सुचली. पण यानंतर त्याच्या तुरुंग नशीबी आलं.

लॉकडाऊनमध्ये डोक्यावर कर्ज झालं, मग कर्ज फेडण्यासाठी त्याने जे केलं त्यानंतर थेट तुरुंगातच गेला !
कांदिवलीत कामगाराकडून सोन्याची चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 2:42 PM

मुंबई : कर्ज फेडण्यासाठी कामगारानेच सोन्याच्या कारखान्यातून सोन्याचा रॉड चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी 24 तासांत सुरत येथून आरोपीला अटक केली. आरोपींकडून चोरीला गेलेला 216 ग्रॅम सोन्याचा रॉड जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत सुमारे 8 लाख 65 हजार रुपये आहे. हनीफ अन्सार मलिक असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. लॉकडाऊनमध्ये कामात तोटा झाल्याने कर्ज वाढले होते. यामुळे त्याने ही चोरी केल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले.

कर्जबाजारी झाल्याने चोरी

फिर्यादी यांचा कांदिवली पश्चिमेला सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात पश्चिम बंगालचे रहिवासी असलेले 4 ते 5 कामगार काम करतात. आरोपीही याच कारखान्यात काम करत होता. लॉकडाऊनच्या काळात आरोपीच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. हे कर्ज कसं फेडायच्या या विवंचनेत आरोपी होता. याचवेळी त्याच्या मनात चोरीचा विचार आला.

मालकाचा विश्वास संपादन करत सोन्याची चोरी

आरोपीने आधी मालकाचा विश्वास संपादन केला, मग मालकाने सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेला 216 ग्रॅम वजनाचा रॉड चोरुन पोबारा केला. आरोपी सोने चोरुन पळाल्याचे लक्षात येताच मालकाने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते, सपोनि सोहम कदम, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित भिसे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. यावेळी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी गुजरातला जाणार असल्याची माहिती मिळाली.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले. तांत्रिक तपास करता आरोपी सूरत येथील एका इमारतीत लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.