अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगत तरुणाला लुटले, आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

पोलीस असल्याची बतावणी करत तरुणाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. अशा घटना रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगत तरुणाला लुटले, आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी
पोलीस असल्याची बतावणी करत तरुणाला लुटलेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 6:54 PM

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे भासवत तरुणाकडून 5.30 लाख रुपये उकळल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दीपक विलास जाधव असे अटक आरोपीचे नाव आहे. तर यश चावला असे पीडित तरुणाचे नाव आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश चावला याचे वर्सोवा येथे स्टेशनरी शॉप आहे. आरोपी वर्सोवा येथे रेस्टॉरंट अँड बारमध्ये गेले होते. यावेळी चौघांनी आपण पोलीस असल्याचे सांगत यशला जवळ बोलावले. मग यशला रिक्षात बसवून रात्रभर शहरात फिरले. यादरम्यान त्याला आपण अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगत ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.

यानंतर तरुणाकडून गूगल पे, एनईएफटीद्वारे 5.30 लाख रुपये लुटले. तसेच 7 लाख रुपयांचा चेक घेतला. मात्र तो चेक बाऊन्स झाला. आरोपींमध्ये रिक्षा चालकाचाही समावेश आहे. अटक आरोपी हा आपण इंजिनिअर असल्याची बतावणी करत होता. आरोपी दिपक जाधववर अनेक केसेस दाखल आहेत. जाधव हा मूळचा वाशिमचा असून, सध्या गोरेगाव येथे राहतो. आरोपींना आणखी कुणाची अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.