पुण्यात जमिनीच्या वादात वाहिला रक्ताचा पाठ, पुतण्यानेच केली चुलतीची निर्घृण हत्या

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात जमिनीच्या वादात वाहिला रक्ताचा पाठ, पुतण्यानेच केली चुलतीची निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 1:43 PM

पुणे : पुण्यात वारंवार गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आताही नात्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुतण्यानेच चुलतीची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (murder in Pune for land dispute women brutally murdered by family member)

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून इंदापूर तालुक्यातील काटी गावात दोन कुटुंबात झालेल्या वादातून पुतण्याने सख्ख्या चुलतीवरती रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. याबाबत मयताचा मुलगा सचिन भोसले याने इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी तात्काळ दोन आरोपिंना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तिसरा आरोपी हा जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जमिनीच्या वादातून सख्खी नाती एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. नात्यामध्ये पैसा आला की गुन्ह्यांच्या घटना समोर येतात असंही आता म्हणावं लागेल.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चुलतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर हत्येमागचा आणखी उलगडा करण्यासाठी पोलीस कुटुंबाचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (murder in Pune for land dispute women brutally murdered by family member)

संबंधित बातम्या – 

सावधान! भर रस्त्यात तरुणावर गोळीबार करणारे अटकेत, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

दहा लग्न करणाऱ्या कोट्यधीशाची संपत्तीच्या वादातून हत्या

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ

(murder in Pune for land dispute women brutally murdered by family member)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.