Jaipur Crime: विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीहून जयपूरला आलेल्या प्रियकराला चाकूने भोसकले

दिल्लीचा रहिवासी तरुण जयपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या विवाहित मैत्रिणीला भेटण्यासाठी सकाळी बसने जयपूरला आला. महिलाही आपल्या जुन्या प्रियकराला भेटण्यासाठी तिथे पोहोचली होती. मात्र हे सर्व महिलेच्या पतीला कळले. पतीही पत्नीचा पाठलाग करीत तिच्या मागे मागे जात तेथे पोहोचला.

Jaipur Crime: विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीहून जयपूरला आलेल्या प्रियकराला चाकूने भोसकले
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 12:36 AM

जयपूर : विवाहित प्रेयसीला दिल्लीहून जयपूरला आलेल्या प्रियकराची महिलेच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना जयपूरमधील विश्वकर्मा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मतदेह ताब्यात घेत स्थानिक रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा परिसरातील रोड क्रमांक 17 वरील उद्योग विहार परिसरात आज पहाटे ही घटना घडली. दिल्लीचा रहिवासी तरुण जयपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या विवाहित मैत्रिणीला भेटण्यासाठी सकाळी बसने जयपूरला आला. महिलाही आपल्या जुन्या प्रियकराला भेटण्यासाठी तिथे पोहोचली होती. मात्र हे सर्व महिलेच्या पतीला कळले. पतीही पत्नीचा पाठलाग करीत तिच्या मागे मागे जात तेथे पोहोचला.

प्रेयसीच्या पतीने चाकून भोसकले

दिल्लीतील हा तरुण पहाटे पाचच्या सुमारास विश्वकर्मा परिसरातील रोड क्रमांक 17 वरील उद्योग विहार येथे बसमधून उतरला होता. त्याची विवाहित प्रेयसी त्याला घेण्यासाठी बसस्थानकावर पोहोचली होती. मात्र दोघांची भेट होताच मागून महिलेचा पती तेथे आला आणि त्याने पत्नीच्या प्रियकराचा चाकूने वार करून खून केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला.

थंडीमुळे लोकांची वर्दळ कमी होती

घटनेची वेळ पहाटेची होती आणि थंडी असल्यामुळे लोक बाहेर कमी होते. त्यामुळेच कोणाला पटकन माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

नुकतेच आणखी एक प्रकरण घडले होते

जयपूरमध्ये नुकताच असाच एक प्रकार घडला होता. जयपूरच्या प्रतापनगर भागात एक तरुण आपल्या विवाहित मैत्रिणीसोबत अपार्टमेंटमध्ये राहत होता. मात्र महिलेचा नवरा तिला शोधत येथे गेला होता. पतीला दारात पाहून प्रेयसी आणि तरुण दोघेही घाबरले आणि प्रेयसीने तरुणाला गॅलरीत लपण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तरुण गॅलरीत लपला होता. मात्र अधिक वेळ त्याला रेलिंगवर लटकल्यानंतर त्याचा हात सुटला आणि तो पाचव्या मजल्यावरुन खाली पडला. यामध्ये जागीच तरुणाचा मृत्यू झाला आहे.  (Murder of a lover who came to Jaipur from Delhi to meet his married girlfriend)

इतर बातम्या

Anil Deshmukh: चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना ठोठावला 50 हजार रुपयांचा दंड, मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्याचे आदेश

Tamilnadu Crime: युट्यूबवर पाहून चोरट्याने ज्वेलर्सच्या दुकानातून लुटले तब्बल 10 कोटींचे सोने

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.