VIDEO : ‘कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार’ म्हणत पिस्तूल हातात घेऊन व्हिडीओ, पोलीस शिपायाचं अखेर निलंबन
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी महेश मुरलीधर काळे यांनी हातात पिस्तूल घेऊन एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तयार केला होता.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी महेश मुरलीधर काळे यांनी हातात पिस्तूल घेऊन एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तयार केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी महेश काळे या कर्मचाऱ्याला अखेर निलंबित केले आहे. हा शासकीय गणवेशात शस्त्राचा धाक दाखविण्याचा प्रकार आहे. काळे यांनी बेशिस्त आणि बेजबाबदारपणे वागल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी काळे यांच्या निलंबणाचे आदेश काढले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अमरावती चांदुर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महेश काळे यांनी हातात पिस्तूल घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी घेतली. अखेर महेश काळे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पोलिसाकडून व्हिडीओच्या माध्यमातून धमकी
कायद्याचे रक्षकच जर अशाप्रकारे कायदा हातात घेऊन व्हिडिओ व्हायरल करत असतील तर सामान्य माणूस कुणाकडे न्याय मागेल? अशाप्रकारे व्हिडिओ करुन समाजात भीती निर्माण करणे चुकीचे आहे. कारण संबंधित व्हिडीओ दहशत निर्माण करण्याबाबतचा स्पष्ट उल्लेख आहे. “तुमचे नियम दहा किलोमीटर लांब ठेवून तुम्हाला अमरावतीत प्रवेश करावा लागेल”, अशी धमकी पोलिसाने व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
निलंबनाची कारवाई योग्य असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत
पोलिसाचा संबंधित व्हिडीओ हा समाजात भीती निर्माण करणारा आहे. त्यामुळे अशा पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सगळ्याच स्तरातून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा याचा निषेध करत या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलीस अधीक्षकांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरज गनथडे म्हणाले आहेत.
पोलीस कर्मचारी व्हिडीओत नेमकं काय म्हणाला?
“अमरावती जिल्ह्यात प्रवेश करताना दादागिरी आणि भाईगिरी दहा किलोमीटर लांबच ठेवून यायचं भाऊ. अमरावतीत जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार. कारण कसंय ना कायद्याचा बालेकिल्ला, ऑन्ली अमरावती जिल्हा”, असं या व्हिडीओत म्हटलं आहे. हा व्हिडीओ करताना काळे हे पोलिसांच्या शासकीय गणवेशात आहेत. सोबतच त्यांच्या हातात एक पिस्तूल देखील दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला जरी पसंती मिळत असली तरी काळे यांना मात्र या व्हिडीओमुळे निलंबित करण्यात आलं आहे.
व्हिडीओ बघा :
हेही वाचा :
पत्नीसोबत भांडण, जातपंचायतीचा नवऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा आदेश, नंतर पतीकडे दोन लाखांची मागणी