स्वतःचं कुंकू प्रियकराच्या हाताने पुसलं! विवाहितेच्या प्रेमात तो इतका आकंठ बुडाला की त्याने चक्क…
Chandrapur Murder News : आरडाओरडा झाल्याने अखेर दुसऱ्या खोलीत असलेली मनोजची आईदेखील खोलीत घुसली. आता आपला प्लान फसतो की काय, असं वाटत असतानाच शिक्षकाने प्लान बी प्रमाणे वागायचं ठरवलं. तो प्लान बी नेमका काय होता?
निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : विवाहितेच्या प्रेमात (Love Tringle) आकंठ बुडालेल्या एका शिक्षकाने तिच्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा (Chandrapur Murder Mystery) काढलाय. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या सिनेमालाही लाजवेल असं प्लानिंग त्या दोघांनी केलं होतं. पोलिसांना गंडवण्यासाठी चोरी झाल्याचं ते दोघंही भासवत होते. विवाहित महिलेचा पती आजारी होता. पण प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पेशान शिक्षक असलेल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केलाय. चंद्रपूर (Chadnrapur Crime News) जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय.
चंद्रपूर शहरात नुकताच एका हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला. शिक्षक प्रियकराच्या मदतीने पत्नीने आजारी असलेल्या पतीचा खून केला. चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड या घनदाट वस्तीत राहणाऱ्या मनोज रासेकर यांच्या पत्नीचे स्वप्निस गावंडे नावाच्या एका शिक्षकासोबत प्रेमसंबंध होते.
वारंवार आजारी असणारे मनोज रासेकर हे त्या दोघांच्या प्रेमाच्या आड येत होते. पतीचा काटा काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी शक्कल लढवली. मनोजच्या हत्येचा कट रचला. प्लानिंगप्रमाणे पत्नीने रात्री घराचं दार उघडंच ठेवलं. मध्यरात्री चोराचा वेष घेत शिक्षक प्रियकर विवाहित प्रेयसीच्या घरात शिरला.
मनोजच्या चेहऱ्यावर उशी कोंबून स्वप्नीलने त्याचा खून केला. आरडाओरडा झाल्याने अखेर दुसऱ्या खोलीत असलेली मनोजची आईदेखील खोलीत घुसली. आता आपला प्लान फसतो की काय, असं वाटत असतानाच शिक्षकाने प्लान बी प्रमाणे वागायचं ठरवलं. अखेर चोरीचा बनाव रचला गेला. ठरल्याप्रमाणे तो चोरीचा प्रयत्न करु लागला.
घरातील कपाटामधील दागिने, वृद्ध आईच्या गळ्यातील सोन्याची पोतदेखील धमकावून लुटली आणि घरातून पळ काढला. सकाळी मनोजच्या पत्नीने ठरलेल्या प्लानप्रमाणे पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीच्या मृत्यूबाबत माहिती दिली. लुटमार झाल्याची प्राथमिक तक्रार पोलिसांना मिळाली.
मनोजच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी हा सगळा घटनाक्रम तपासला. पण संशय आल्यानं पोलिसांनी मृत मनोजच्या पत्नीचा फोन तपासला. तिचे कॉल डिटेल्स काढले. यातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या हत्येमागे लव्ह ट्रॅन्गल असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी याप्रकरणी मुख्म आरोपी असलेल्या शिक्षकाला अटक केलीय. तो चंद्रपुरातील एका नामांकित शाळेत शिक्षक होता.
आपला पती आजारपणात मरण पावला, असं पत्नीला भासवायचं होतं. पण तिचा तो प्रयत्न असफल ठरला. चंद्रपूरमधील स्थानिक क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या खळबळजनक हत्याकांड प्रकरणाची माहिती दिलीय.