दारुड्यांचा धिंगाणा, विरोध करणाऱ्या युवकाला शिवीगाळ, नंतर गोळ्या झाडल्या

धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यांना विरोध केला म्हणून त्यांनी एका तरुणावर चार गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दारुड्यांचा धिंगाणा, विरोध करणाऱ्या युवकाला शिवीगाळ, नंतर गोळ्या झाडल्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 8:02 PM

नागपूर : नागपुरात गुन्हा घडण्यासाठी काही मोठं विशेष कारण लागत नाही, असं म्हणतात. ते अगदी खरंच आहे. कारण धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यांना विरोध केला म्हणून त्यांनी एका तरुणावर चार गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने दारुड्यांचा नेम चुकल्याने युवकाचा जीव बचावला आहे. त्याचबरोबर कुणीही जखमी झाले नाहीत. पण या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडल?

हात ठेला चालवून आपलं पोट भरणारे काही युवक गोवा कॉलोनीमध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी त्याठिकाणी दोन दारुडे नशेत टून होऊन आले. त्यांनी कारण नसताना जोरदार शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी बसलेल्या युवकांपैकी एकाने त्याला हटकलं. मात्र दारुडे युवकाला सुद्धा शिवीगाळ करायला लागले. त्यामुळे युवकाने एका दारुड्याच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर दुसरा दारुडा त्याच्या मित्राला घेऊन निघून गेला. पण घटना इथेच थांबली नाही.

दारुडे बदला घेण्यासाठी आले, मोठा गदारोळ

युवकाने कानशिलात लगावल्याने दारुड्यांनी बदला घेण्याचं ठरवलं. ते थोड्या वेळाने त्याच ठिकाणी आपल्या 6 मित्रांना घेऊन दाखल झाले. त्यांनी शिवीगाळ सुरु केली. कुठे आहे तो? म्हणत ते युवकाला शोधू लागले. यावेळी संबंधित तरुण पुढे आला. त्यानंतर एका दारुड्याने त्याच्या देशी कट्ट्यातून तरुणावर चार गोळ्या झाडल्या. पण सुदैवाने त्याचा नेम चुकला. त्यामुळे तरुणाचा जीव बचावला. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही.

सहा गुंडांना बेड्या

इतर गुंडांकडेही शस्त्र असल्याने वस्तीतील लोकांनी नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे गुंड पळून गेले. पण या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाची आणि वस्तीतील नागरिकांची विचारपूस केली. त्यानंतर गुंडांचा शोध घेत 6 जणांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी गुंडांकडील सर्व शस्त्रे ताब्यात घेतले आहेत.

हेही वाचा : पाच चोर पकडले, 10 गुन्हे उघड झाले, 32 मोबाईल, कारसह लाखोंचं घबाड सापडलं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.