वेगाने गाडी चालवण्यावरुन वाद, चौघांनी मिळून तरुणाला घेरलं, नागपुरात निष्पाप जिवाची हत्या

नागपुरात हत्या करण्यासाठी कारण लागत नाही हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. क्षुल्लक कारणावरून एका निर्दोष युवकाची हत्या करण्यात आली आहे (four friends killed youth over dispute on fast bike riding)

वेगाने गाडी चालवण्यावरुन वाद, चौघांनी मिळून तरुणाला घेरलं, नागपुरात निष्पाप जिवाची हत्या
वेगाने गाडी चालवण्यावरुन वाद, चौघांनी मिळून तरुणाला घेरलं, नागपुरात निष्पाप जिवाची हत्या
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 8:24 PM

नागपूर : नागपुरात हत्या करण्यासाठी कारण लागत नाही हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. क्षुल्लक कारणावरून एका निर्दोष युवकाची हत्या करण्यात आली आहे. गाडी वेगाने चाववतो या क्षुल्लक कारणावरुन काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाची हत्या केली. संबंधित घटना ही कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश नगर परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. त्याचादेखील पोलीस शोध घेत आहे (four friends killed youth over dispute on fast bike riding).

नेमकं प्रकरण काय?

गणेश नगर परिसरात काही तरुण वेगाने गाडी चालवत. त्यावरुन वस्तीतील युवक हे वेगाने गाडी चालवणाऱ्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी शाहरुख नावाचा युवक परिसरात आपली बुलेट घेऊन आला होता. तो काही कारणास्तव परिसरात थांबला होता. यावेळी तिथे परिसरातील चार तरुण आले. त्यांना शाहरुख हा वेगाने गाडी चालवणाऱ्यांच्या गँगमधील सदस्य वाटला.

शाहरुखसोबत हुज्जत, नंतर मारहाण

आरोपींनी शाहरुख सोबत आधी हुज्जत घातली. कुठून आला, तिथे येण्याचं कारण काय? अशा प्रकारचे प्रश्न विचारले. त्यानंतर गाडी वेगाने चालवणाऱ्यांमध्ये तू सुद्धा आहे, असं म्हणत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी मिळून शाहरुखला सिमेंटच्या दगडाने मारहाण केली. या मारहाणीत शाहरुखचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपींना बेड्या

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटस्थळी पंचनामा करत कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर चौथ्याचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे यापैकी काही आरोपींवर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत (four friends killed youth over dispute on fast bike riding).

हेही वाचा : आधी दोन निष्पाप पोटच्या मुलांचा बळी घेतला, नंतर विहिरीत फेकलं, जन्मदात्या पित्याने निघृण कृत्य का केलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.