25 वर्षीय प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह आत्महत्या, विष पिऊन आयुष्य संपवलं

अमरावतीतील प्रेमी युगुलाने विषारी द्रव्यं प्राशन केली. त्यानंतर दोघांचीही तब्येत बिघडली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

25 वर्षीय प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह आत्महत्या, विष पिऊन आयुष्य संपवलं
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 2:35 PM

अमरावती : प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या (Couple Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली येथील जोडप्याने टोकाचं पाऊल उचललं. मात्र त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना मंगळवार 14 डिसेंबरला दुपारी समोर आली. संबंधित 25 वर्षीय तरुणाचे गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी तरुण 17 वर्षीय प्रेयसीसोबत श्री क्षेत्र सालबर्डी येथे गेले होते. दोघं लहान महादेवाच्या भुयार मार्गावर असलेल्या हत्तीडोहाच्या पहाड परिसरात गेले.

प्रेमी युगुलाने विषारी द्रव्यं प्राशन केली. त्यानंतर दोघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. संध्याकाळी उपचारादरम्यान प्रियकाराचा मृत्यू झाला. तर बुधवारी सकाळी प्रेयसीचीही प्राणज्योत मालवली.

शेतकऱ्याचा गळफास

दुसरीकडे, सासरी नांदणाऱ्या लेकीला शेतकरी बापानं फोन लावावा, ‘पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, आता कर्ज फेडू शकत नाही. जगणं असहाय्य झालंय, इथं बघ शेतातील झाडाला गळफास घेतोय, लवकर मातीला ये..’ असं मोबाइल सांगत आत्महत्या करावी. हा हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये घडलाय. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं बुधवारी पहाटेच चिंचोटी परिसरात आत्महत्या केली.

संबंधित बातम्या :

 ट्रीटमेंटसाठी तीन लाख खर्च करण्यावरुन वाद, मुंबईकर सूनेने सासूचा गळा आवळला

पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, गळफास घेतोय, लवकर मातीला ये.. म्हणत त्यानं जीव संपवला…

14 वर्षीय मोलकरणीवर जंगलात अत्याचार, भिवंडीत मालकाला अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.