24 वर्षीय तरुणीवर बलात्कार, यूट्यूब व्हिडीओ बघून घरीच गर्भपात करण्याची बळजबरी, नागपुरात प्रियकराला अटक

आरोपी सोहेल वहाब खान आहे आणि पीडित तरुणी जवळपास गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सोहेलने 2016 पासून वारंवार आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला.

24 वर्षीय तरुणीवर बलात्कार, यूट्यूब व्हिडीओ बघून घरीच गर्भपात करण्याची बळजबरी, नागपुरात प्रियकराला अटक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 2:21 PM

नागपूर : 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

काय आहे प्रकरण?

आरोपी सोहेल वहाब खान आहे आणि पीडित तरुणी जवळपास गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सोहेलने 2016 पासून वारंवार आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, जेव्हा पीडित तरुणी गर्भवती झाली, तेव्हा आरोपीने तिला यूट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:चा गर्भपात करण्यास सांगितले. कुटुंब घरात नसताना तिने घरीच नाळ कापून गर्भपात केल्याची माहिती आहे.

स्मशानभूमीत गर्भाचे दफन

अहवालात म्हटले आहे की, सोहेलने ताज नगर स्मशानभूमीत गर्भाचे दफन केले. काही आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र गेल्या आठवड्यात महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेच्या कुटुंबाला असे वाटते, की सोहेलने तिला खोटी आश्वासने देऊन फसवले, कारण तो आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे, तर त्याची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीचे दोन वेळा लग्न

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोहेल खान हा ड्रायव्हर असून यापूर्वी दोनदा त्याचे लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते आणि त्याला एक मुलगाही आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी खानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. तर फॉरेन्सिक टीमने गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो सफल होऊ शकला नाही.

डीएनए नमुन्यांसाठी आम्ही गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण दुर्दैवाने त्याचा शोध लागला नाही. आम्ही अजूनही गर्भाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलीस अधिकारी म्हणाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

बुलडाण्यात बलात्कार पीडितेची आत्महत्या

दुसरीकडे, बुलडाण्यात चार दिवसांपूर्वी एका तरुणीने आत्महत्या केली होती. तिने लिहिलेली सुसाईड नोट भगवद्गीतेत सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. निल्या आणि गण्या यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी एक जण हा पीडितेचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

बॉयफ्रेण्डकडून बलात्काराचं व्हिडीओ शूट, 14 वर्षीय मुलीवर 31 जणांचा गँगरेप, डोंबिवलीत खळबळ

निल्या आणि गण्याने माझ्यावर बलात्कार केला, भगवद्गीतेत सुसाईड नोट ठेवत तरुणीची आत्महत्या

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार, अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार; नाशिकमध्ये दोघांना बेड्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.