नागपुरातून बुलेट, पल्सर सारख्या महागड्या दुचाकी चोरायचे, मध्यप्रदेशात विक्री, पोलिसांकडून मोठ्या गँगचा पर्दाफाश

गपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. शहरात एक वाहन चोरांची मोठी गँग कार्यरत होती. ही गँग शहरातील बुलेट आणि पल्सरसारख्या महागड्या दुचाकी चोरी करायची.

नागपुरातून बुलेट, पल्सर सारख्या महागड्या दुचाकी चोरायचे, मध्यप्रदेशात विक्री, पोलिसांकडून मोठ्या गँगचा पर्दाफाश
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 12:40 AM

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. शहरात एक वाहन चोरांची मोठी गँग कार्यरत होती. ही गँग शहरातील बुलेट आणि पल्सरसारख्या महागड्या दुचाकी चोरी करायची. त्यानंतर या दुचाक्या मध्यप्रदेशात नेवून विक्री करायचे. त्यांच्या या कृत्याची अखेर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी मध्यप्रदेशातून चार चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या तपासात आणखी काही चोरट्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

नेमकं प्रकरण काय?

नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांकडे गेल्या काही दिवसांपासून सतत बुलेट, पल्सर सारख्या महागड्या दुचाकी चोरी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी या तक्रांरीना गांभीर्याने घेत त्याकडे लक्ष केंद्रित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. दुचाकी चोरीच्या घटनांचं थेट मध्यप्रदेशसोबत कनेक्शन असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे पोलिसांनी आणखी खोलात शिरण्याचा प्रयत्न केला.

अखेर तिघांना बेड्या

अखेर तपासादरम्यान पोलिसांना दुचाकी चोरांची टोळीच त्यांच्या हाती लागली. पोलिसांनी याप्रकरणी मध्यप्रदेशमधील तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 बुलेट, 5 पल्सर आणि एक स्प्लेनडर गाडी जप्त केली आहे. या टोळीत आणखी काही लोकांचा सहभाग आहे का? तसेच आरोपींनी आणखी काही वाहन चोरली आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. महत्वाचं म्हणजे याआधी सुद्धा नागपुरात मध्यप्रदेशमधील बाईक चोरांची गॅंग पकडण्यात आली होती.

स्वत:ची चैन भागवण्यासाठी वाहनचोरी

विशेष म्हणजे नागपूरच्या धंतोली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच एका वाहन चोराला अटक केली होती. हा चोर देखील मध्य प्रदेशात चोरी केलेल्या दुचाकी विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे आरोपी स्वत:ची चैन भागवण्यासाठी दुचाकी चोरी करायचा. तो जुगार आणि इतर व्यसन पूर्ण करण्यासाठी वाहने चोरी करायचा, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या तब्बल 13 दुचाकी जप्त केल्या आहेत.

चोरलेले वाहन विकलेल्या पैशातून जुगार खेळायचा

संबंधित दुचाकी चोराचं नाव संदीप टेंभरे असं असल्याची माहिती समोर आली. तो खरंतर मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. पण नागपुरात दुचाकी चोरीच्या उद्देशाने यायचा. तो नागपुरात येत-जात असायचा. काही दिवस नागपुरात राहायचा. तो नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरायचा. त्या दुचाकी तो मध्यप्रदेशात घेऊन जायचा. तिथे तो आपल्या ओळखीच्या लोकांकडे दुचाकी गहाण ठेवायचा. त्यांच्याकडून त्यामोबदल्यात मिळालेल्या पैशातून आपल्या चैन भागवायचा. आरोपी त्या पैशांमधून दारुचं व्यसन करायचा. तसेच जुगार खेळायचा.

हेही वाचा :

VIDEO : रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालात शैक्षणिक शुल्कावरुन वाद, विद्यार्थ्याने प्राचार्याच्या केबिनमध्ये स्वत:चं डोकं आपटलं, सीसीटीव्ही घटना कैद

तस्कराने चक्क शरीराच्या ‘या’ भागात लपवली सोन्याची पेस्ट, कल्पनेच्याही पलिकडे

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.